केवळ १९,९९० मध्ये मिळतोय i Phone
आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण महाग किंमतीमुळे बऱ्याचदा ते अशक्य होतं. पण या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला १९,९९० रुपयापर्यंत आयफोन घेता येऊ शकतो.
मुंबई : आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण महाग किंमतीमुळे बऱ्याचदा ते अशक्य होतं. पण या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला १९,९९० रुपयापर्यंत आयफोन घेता येऊ शकतो.
पेटीएम मॉलवर सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळे डिस्काऊंड आणि कॅशबॅक दिले जात आहेत. ज्यामध्ये अॅपलचा आयफोन आणि मॅकबुकचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पेटीएम मॉलच्या साईटवरुन मॅकबुक एअर किंवा प्रो खरेदी केल्यावर १० पर्यंतचा कॅशबॅकही मिळणार आहे.
ही आहे अॅपलची ऑफर
अॅपलचा सर्वास स्वस्त मॉडेल iPhone SE पेटीएम मॉलवर २२,९९० मध्ये खरेदीसाठी आहे. पण कंपनी या खरेदीवर ३ हजार पर्यंतची कॅशबॅक देत आहे. याचा अर्थ कोणताही आयफोन SE खरेदी करताना ग्राहकांना केवळ १९,९९० रुपयेच द्यावे लागणार आहेत.
हे ही लक्षात असू द्या
तुम्ही जेव्हा प्रोमोकोड टाकाल तेव्हाच तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजे पेमेंट करताना ‘Have Promocode’ असे विचारले जाईल. ज्यामध्ये तुम्हाला ‘PhoneSE’ प्रोमोकोड टाइप करावा लागेल. प्रोमोकोडचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅश ऑन डिलीव्हरीचे ऑप्शन दिले जाणार नाही.
या व्यतिरिक्त पेटीएम आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर दिली जात आहे. या सेलमध्ये लॅपटॉप खरेदीवर १० हजारापर्यंतची कॅशबॅक ऑफर मिळत आहे.