नवी दिल्ली : तुमच्याकडे देखील आयफोन आहे किंवा तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करताय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंवा तुमचा जूना फोन आयफोनसोबत रिप्लेस करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी जरूर वाचा. अॅप्पलचा आयफोन हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा फोन आहे. नुकताच अॅप्पलने आयफोन ८ लाँच केला आहे. आयफोनला बेस्ट टेक्नॉलॉजी, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी ओळखलं जातं. टेक एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, आयफोन एंड्रॉइडपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


यामुळे आयफोनची लोकप्रियता जगभरात सर्वाधिक आहे. आणि कोणताही आयफोन लाँच झाला की लोकं खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात. मात्र जेव्हा फोन विकण्याचा विचार केला जातो तेव्हा एंड्रॉइंड पुढे असतं. याचं कारण आहे आयफोनचं महाग असणं. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे आयफोनमध्ये एंन्ड्रॉइडमधले ते वर्षानुवर्ष चालत आलेले ते फिचर्स नाहीत.


आयफोनमध्ये नाहीत हे फीचर्स 


कोणत्याही केबलने चार्ज होत नाही फोन 


आयफोन युझर्सला कायम फोन चार्जर सोबत घेऊन फिरावं लागतं. कारण आयफोन इतर कोणत्याही चार्जरने चार्ज होत नाही. याच्या USB केबलचे कनेक्शन अतिशय वेगळे आहे. तर एंड्रॉइडच्या बाबतीत असं होत नाही याची USB ही कॉमन आहे. त्यामुळे या युझर्सना याचा फायदा होतो. 


ड्युअल सिम सपोर्ट नाही 


आयफोनचे असे अनेक युझर्स आहेत ज्यांच्याकडे दुसरा स्मार्टफोन असतो. याच कारण आयफोनमध्ये ड्युअल सिम चालत नाही. आयफोनमध्ये ड्युअल सिमचे हार्डवेअर फिचर देण्यात आलेले नाही. तर एंड्रॉइड फोनमध्ये हे फिचर खूप वर्षांपूर्वी आलेले आहे 


स्टोरेज लिमिटेशन 


एका सामान्य ग्राहकासाठी आयफोन खरेदी करणं थोडं कठीण आहे. आणि तरी देखील त्याने मॅनेज केलं तर स्टोरेजचे लिमिटेशन हे आहेच. आयफोनमध्ये फिक्स इंटरनल स्टोरेज आहे.  यामध्ये १६ जीबी ते अगदी २५६ जीबीपर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचे ऑप्शन नाही 


 एंड्ऱॉइड प्रोफाइल नाही 


आयफोन अॅप्पलच्या iOS वर रन करतो. त्याचप्रमाणे त्यांचे स्वतःचे प्ले स्टोर आहे. हे अॅप्पल स्टोर गूगलच्या प्ले स्टोरप्रमाणे आहे. मात्र जेव्हा गोष्ट अॅप्सची येते त्यामध्ये आयफोन भरपूर मागे आहे. एंड्रॉइडवर असे हजारो अॅप्स आणि गेम्स आहेत. एंड्रॉइड या रेसमध्ये आयफोनच्या भरपूर पुढे आहे. 


वायरलेस चार्जिंग नाही 


आयफोनला बेस्ट टेक्नॉलॉजी, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी ओळखलं जातं. पण वायरलेस चार्जिंगच्या फिचरमध्ये आयफोन सर्वात पाठी आहे. अॅप्पलला फाइट करणारी कंपनी म्हणून सॅमसंग ओळखली जाते. सॅमसंग गॅलेक्सी S6 हँडसेटमध्ये वायरलेस चार्जिंग फिचर देखील आले आहे. 


अॅप कस्टमाइज ऑप्शन 


एंड्राइड युझर्स आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला विजेट्ससोबत कस्टमाइज करतात. स्क्रीनवर कोणत्या अॅपला कुठे ठेवायचे हे तो युझर्स ठरवू शकतो. अॅप्स रिअल टाइममध्ये वर्क करू शकतात. 


कॉल रेकॉर्डिंग नाही 


आयफोनच्या कोणत्याही फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे ऑप्सन नाही. थर्ड पार्टी अॅपद्वारे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केलं जाऊ शकतं. मात्र यासाठी अनेक सेटिंग फॉलो कराव्या लागतात. मात्र एंड्रॉइडमध्ये कोणत्याही अॅपद्वारे हे काम सहज करू शकतो.