नवी दिल्ली : सेल्फी चाहत्यांसाठी मार्केटमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च झालाय. या स्मार्टफोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. म्हणजे एकूण तीन कॅमेरे या फोनमध्ये असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्फी शौकीनांना डोळ्यांसमोर ठेवूनच हा फोन तयार करण्यात आलाय. त्यासोबतच फोनमध्ये अनेक फिचर्सही देण्यात आले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामन्यांना परवणारा हा स्मार्टफोन आहे. मोबाईल निर्माता कंपनी आयटेलने दावा केलाय की, दोन सेल्फीवाला कॅमेरे असलेला हा सर्वात स्वस्त फोन आहे. जाणून घेऊया या फोनची खासियत...


डिस्प्ले -


मोबाईल निर्माता कंपनी आयटेलने लॉन्च केलेल्या या S21 फोनमध्ये ५ इंचाची एफडब्ल्यूवीजीए आयपीएस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये कंपनीने ६ बिट १.१ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेलाय. यासोबतच यात ग्राफिक्ससाठी माली-टी८६० एमपी १जीपीयू दिला आहे. 


रॅम आणि मेमरी -


आयटेल S21 मध्ये १ जीबी रॅम आणु १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. 


कॅमेरे -


या स्मार्टफोनमध्ये तीन आकर्षक कॅमेरे देण्यात आले आहेत. आयटेल S21 मध्ये १२० डिग्री पॅनोरमिक फिल्ड व्यू असणारे दोन फ्रन्ट कॅमेरे देण्यात आले. ग्रुप सेल्फीसाठी फोनमध्ये वाईड अपार्चर दिलं आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे दोन फ्रन्ट सेंसर आहेत. ऑटोफोकस आणि फेस डिटेक्शनसोबत ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आलाय. 


बॅटरी -


या बजेट स्मार्टफोनमध्ये २७००mAh बॅटरी देण्यात आलीये. जी ४जी नेटवर्कवर १० तस, ३जी नेटवर्कवर १५ तास आणु ३५० तासांचं स्टॅंडबाय मिळणार असा दावा कंपनीने केलाय. 


अन्य फिचर -


५ हजार ९९९ रूपयांच्या या आयटेल S21 मध्ये फिंगरप्रिंत सेंसर, ड्युअल अ‍ॅपसारखे महत्वाचे फिचर दिले आहेत.