Royal Enfield ला तगडी स्पर्धा, JAWA ची दमदार मॉडर्न रेट्रो बाईक लाँच; फक्त 942 रुपयांत करा बूक, मग किंमत किती?
Jawa 42 FJ मध्ये कंपनीने 334 सीसी क्षमतेच्या लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे. नियमित Jawa 42 च्या तुलनेत हे इंजिन जवळपास 2hp जास्त पॉवर जनरेट करतं.
Jawa 42 FJ Price and Features: क्लॉसिक लिजेंड्सने आपली नवी दुचाकी Jawa 42 FJ ला अखेर लाँच केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या बाईकची 1.99 लाखांपासून सुरु होत आहे. दरम्यान टॉप मॉडेलसाठी 2.20 लाख (एक्स शोरुम, दिल्ली) मोजावे लागणार आहेत. नियमित Jawa 42 च्या तुलनेत ही बाईक 26 हजारांनी महाग असेल. कंपनी या बाईकची प्री-बुकिंग सुरु केली आहे. कंपनीच्या अधिकृत बेवसाईटवर फक्त 942 रुपयांत बूक करु शकता.
कशी आहे Jawa 42 FJ?
बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचं गेल्यास तिला मॉडर्न-रेट्रो लूक देण्यात आला आहे. यात टियर ड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी देण्यात आली आहे. साईड पॅनेल जावा 42 प्रमाणेच आहे, जे ब्रँडचा इतिसाह घेत खासप्रकारे डिझाईन कऱण्यात आलं आहे.
जावा 42 एफजे मध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील, ब्लॅक-आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाईप सारखे एलिमेंट्स आहेत, जे बाईकला थोडा स्पोर्टी लुक देखील देतात. त्याच्या बेस मॉडेलमध्ये वायर-स्पोक व्हील देण्यात आले आहेत. कंपनीने ही बाईक एकूण पाच रंगांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये अरोरा ग्रीन मॅट, कॉस्मो ब्लू मॅट, मिस्टिक कॉपर, डीप ब्लॅक - रेड क्लॅड आणि डीप ब्लॅक - ब्लॅक कॅड यांचा समावेश आहे. या सर्व कलर व्हेरियंटची किंमतही वेगळी आहे.
पॉवर आणि परफॉर्मन्स
या मोटरसायकलमध्ये कंपनीने 334 सीसीचे मोठे लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन वापरलं आहे. जे 29.1hp पॉवर आणि 29.6Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लच तंत्रज्ञानासह 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन नेहमीच्या Jawa 42 पेक्षा सुमारे 2hp अधिक पॉवर जनरेट करते. एकूणच कंपनीच्या दाव्यानुसार लुक, डिझाइन आणि परफॉर्मन्सच्या आधारावर ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.
फिचर्स काय आहेत?
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं गेल्यास बाईकमध्ये एलईडी लाइट्स, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि सिंगल-पॉड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. बाईकमध्ये स्टील चेसिसचा वापर करण्यात आला आहे, जो 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक शोषक यांसारख्या सस्पेंशनने सुसज्ज आहे. ब्रेकिंगसाठी, समोर 320 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.
Jawa 42 FJ चं वजन एकूण 184 किलो आहे. सीटची उंची 790 मिमी आहे. म्हणजेच सरासरी उंचीच्या लोकांसाठी देखील ही बाईक चांगला पर्याय आहे. त्याचे ग्राउंड क्लियरन्स 178 मिमी आहे. ही बाईक नेहमीच्या Jawa 42 पेक्षा जवळपास 2 किलो वजनाना जास्त आहे.
कोणाशी आहे स्पर्धा?
Jawa 42 FJ बाईक 350 cc सेगमेंटमधील बाईक्सशी स्पर्धा करेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 350, टीव्हीएस रोनिन आणि रॉयल एनफील्ड हंटर 350 मॉडेल्सशी तिची स्पर्धा असेल. नुकतीच Royal Enfield ने नवीन Classic 350 लॉन्च केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 1,99,500 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 2,30,000 रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) निश्चित करण्यात आली आहे.