नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर रिलायंस जिओ एका मागे एक धमाके करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यातच जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठं यश मिळालं. जिओ कंपनी आता नफ्यामध्ये देखील पोहोचली आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी काही खास प्लान आणले आहेत. वेगवेगळे प्लान आणून जिओ आपल्या ग्राहकांना खूश करत असते. ग्राहक याचा फायदा देखील घेतात. ग्राहकांना खूश करण्यासाठी जिओने १०० रुपयांपेक्षा कमीचे ३ प्लान आणले आहे.


पहिला प्लान


जिओचा सर्वात स्वस्त प्लान १९ रुपयांचा आहे. यामध्ये यूजरला अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिगंची सुविधा मिळते. या शिवाय २० एसएमएस देखील मिळतात. या प्लानची वैधता १ दिवसांची असते.


दुसरा प्लान


जिओचा दुसरा प्लान आहे ५२ रुपयांचा. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानची वैधता 7 दिवसांची असते. यामध्ये रोज  0.15 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हाय स्पीड डेटाची लिमिट संपल्यानंतर इंटरनेट अनलिमिटेड सुरु असतं पण त्याचा वेग कमी होतो. ४ जीच्या ऐवजी 64Kbps ची स्पीड मिळते.


तिसरा प्लान


जिओचा तिसरा प्लान आहे ९८ रुपयांचा आहे. या रिचार्जमध्ये यूजरला 2.1GB डेटा मिळतो. या प्लानची वैधता १४ दिवस असते. यामध्ये रोज 0.15 जीबी हायस्पीड डेटा मिळेल.