Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन! कमी किमतीत मिळवा बंपर डेटा, अमर्यादित कॉल, SMS अन् बरंच काही
रिलायन्स जिओ कंपनीचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएससह अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओ कंपनीचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएससह अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तुम्ही जर Jio चे ग्राहक असाल आणि तुम्ही किंमतीत चांगला प्लान शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही निवडक प्लान घेऊन आलो आहोत.
रिलायन्स जिओचा 209 रुपयांचा प्लॅन
Reliance Jio कंपनीचा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी दररोज 1 GB डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएससह जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा 179 रुपयांचा प्लान
जिओचा हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. Jio च्या या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो.
म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही एकूण 24 GB डेटाचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
<