मुंबई: नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी आपले दर वाढवले आहेत. असं असलं तरी देखील जिओ दर वाढवूनही खिशाला परवडण्यासारखं असल्याचं अनेकांचं मत आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणतं. यावेळी देखील  3 GB डेटासोबत  Disney+ Hotstar ची सेवा जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिना असो किंवा 84 दिवसांचा प्लॅन एअरटेल किंवा वोडाफोनपेक्षा नक्कीच खिशाला परवडणारा प्लॅन जिओ देत असल्याचं काही युझर्सचं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला तीन सिक्रेट प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये 3 GB डेटा आणि Disney+ Hotstar ची सुविधा मिळणार आहे. 


499 प्लॅनमध्ये काय विशेष?


419 रुपयांच्या या प्लॅनची 28 दिवसांची वैधता मिळणार आहे . या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB इंटरनेट मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 84GB डेटा मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळणार आहेत.


601 रुपयांचा दुसरा प्लॅन आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 6 GB अतिरिक्त डेटा वापऱण्यासाठी मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये 3 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 100 SMS मिळणार आहेत. याशिवाय ग्राहकांना Disney + Hotstar VIP आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन देखील मिळेल.


1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 3GB डेटाच मिळत नाही, सोबतच, कोणत्याही अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. हा प्लान Jio Cloud, Jio Cinema आणि Jio TV सारख्या सर्व Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन ग्राहकांना मिळतं.