२०१९ या नवीन वर्षात जिओ ग्राहकांना देणार ३ खास गिफ्ट
जिओच्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात खुशखबर
मुंबई : २०१९ या नवीन वर्षात अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणत आहेत. प्रत्येक कंपनी काहीतरी वेगळा करण्याचा विचार करत आहे. त्यातच जिओ देखील आपल्या ग्राहकांसाठी ३ नव्या गोष्टी घेऊन येणार आहे. रिलायान्स जिओ मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीने ग्राहकांना नवीन भेट देणार आहे. जिओच्या ग्राहकांसाठी २०१९ हे वर्ष खास असल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी GigaFiber सर्विस सोबतच VoWi-Fi सर्विस आणि 4G स्मार्टफोन देखील लॉन्च करणार आहे.
१. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने लवकरच VoWi-Fi सर्विस सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे लोकांना नेटवर्क नसतानाही कॉल करता येणार आहे. कंपनीने मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ याठिकाणी वॉइस ओवर Wi-Fi (VoWi-Fi) ची चाचणी केली आहे. हे सर्विस सुरु झाल्यानंतर यूजर्सला डायलर अॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे नेटवर्क नसलं तरी तुम्हाला वॉईस कॉल करता येणार आहे.
२. नवीन वर्षात जिओ आपला फीचर फोन यूजर्सला 4G स्मार्टफोन देणार आहे. यासाठी रिलायन्स जिओने इतर कंपन्यांसोबत चर्चा देखील सुरु केली आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला व्हीडिओसोबतच कंटेटमध्ये देखील नवा अनुभव मिळणार आहे. हा जिओ फोन खूपच स्वस्त असल्याचं देखील म्हटलं जात आहे. जिओने आतापर्यंत २ फीचर फोन लॉन्च केले आहेत. ज्याची किंमत १५०० आणि २२०० रुपये आहे.
३. जिओने नवीन वर्षात ऑगस्टमध्ये जिओ GigaFiber सर्विसची घोषणा केली होती. यासाठी नोंदणी देखील सुरु झाली आहे. कंपनी नवीन वर्षात ही सेवा सुरु करणार असल्याचं कळतं आहे. जिओची ब्रॉडबँड सर्विस देशातील ११०० शहरांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. जिओची ही सेवा मिळवण्यासाठी यूजरला Jio.com किंवा जिओ अॅपमधून नोंदणी करावी लागणार आहे.