Jio चं भन्नाट फिचर,ग्राहकांना होणार मोठा फायदा
कुठलंही अतिरीक्त रिचार्ज न करता जिओचे नवीन फिचर ग्राहकांना वापरता येणार
मुंबई : जिओ कंपनी ग्राहकांची सेवा आणखीण चांगली करण्यासाठी नवनवीन फिचर्स आणत असते. नुकतेच जिओने आणखीण एक नवीन फिचर्स आणले आहे. या फिचर्सना ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या फिचर्ससाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही आहेत. तुमच्या नेहमीच्याय रिचार्जमध्ये या नवीन फिचरचा लाभ घेता येणार आहे.
जिओ त्याच्या बहुतेक प्लॅन्ससह त्याच्या अॅप्सना विनामूल्य सदस्यता देते.यापैकी एक अॅप म्हणजे JioTV, ज्यावर तुम्ही अनेक लोकप्रिय टीव्ही शो आणि लाइव्ह चॅनेल पाहू शकता. तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता या प्लॅटफॉर्मवर सामने, टीव्ही शो, चित्रपट आणि थेट चॅनेल पाहू शकता. आता याच प्लॅटफॉर्मवर सर्व शो अथवा सामने पाहण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिओने फिचर आणले आहे.
नवीन फिचर काय?
जिओ कंपनीने Jio Watch Party हे नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबासह कंटेंट पाहू शकता. वॉच पार्टी फिचर्स हळूहळू सर्व सुविधा देणार आहे. सध्या तुम्ही ते फक्त क्रिकेट पाहण्यासाठी वापरू शकता. जिओ टीव्हीवर क्रिकेट बघायला लागताच तुम्हाला 'वॉच पार्टी'चा पर्याय मिळेल. या पर्यायावर टॅप करून तुम्ही पार्टी सुरू करू शकता.
विशेष म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची वॉच पार्टी तयार करू शकता किंवा इतरांच्या वॉच पार्टीमध्ये सामील होऊ शकता. यासाठी तुम्हाला त्यांनी पाठवलेली लिंक वापरावी लागेल.
इंग्लंड वि. भारत सामना पाहता येणार
इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेली एकदिवसीय मालिका या फिचरमध्ये युझर्सना पाहता येणार आहे. या मालिकेतील पुढील सामना 17 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्याचा आनंद मित्र-मैत्रिण अथवा कुटूंबासोबत घेता येणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी तुमचे अॅप अपडेट असणे गरजेचे आहे.
जिओ आगामी काळात इतर इंटरटेंमेंटसाठी देखील हे वैशिष्ट्य सुरू करू शकते. सध्या ही सुविधा फक्त क्रिकेटसाठी उपलब्ध आहे.