Jio New Prepaid Plan: 'जिओ'ने (Jio) नवे रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) लॉन्च केले आहेत. हे दोन्ही प्लॅन्स दैनंदिन 2.5 जीबी डेटासहीत (2.5 GB Data) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये युझर्सला कॉलिंगबरोबर (Free Calling) एसएमएस (SMS) आणि इतर फायदेही मिळणार आहेत. 'जिओ'ने आपले नवे रिचार्ज प्लॅन 30 दिवस आणि 90 दिवसांच्य व्हॅलिडीटीसहीत बाजारात लॉन्च केले आहेत. जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर हा प्लॅन नक्कीच फायद्याचा ठरु शकतो.


नवीन वर्षाला लॉन्च केलेले दोन प्लॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने 899 रुपये आणि 349 रुपये प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सचा (Jio Prepaid Plan) आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये युझर्सला सारखेच बेनिफिट्स मिळणार आहेत. नुकतेच 'जीओ'ने नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2023 रुपयांचा नवा प्लॅन आणि 'जिओ न्यू इयर ऑफर' (Jio New Year Offer) लॉन्च केली होती. सध्या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या ऑफर्स काय आहेत जाणून घेऊयात...


या प्लॅनमध्ये काय काय मिळणार?


या दोन्ही प्लॅनमध्ये दिवसाला 2.5 जीबी डेटा युझर्सला मिळणार आहे. यामध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. म्हणजेच पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये युझर्सला एकूण 225 जीबी डेटा वापरता येणार आहे. जिओ सबस्क्राइबर्सला या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दिवसाला 100 मोफत एसएमएस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिओचा हा 30 दिवसांचा प्लॅन 349 रुपयांना उपलब्ध असून 90 दिवसांचा प्लॅन 899 रुपयांना उपलब्ध असेल.


हे ही वाचा >> Netflix: मित्रांबरोबर Netflix Password शेअर करणं 'महागात' पडणार; कंपनीचा नवा नियम


हा सुविधा मिळणार फ्री


या शिवाय या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही दिलं जाणार आहे. युझर्सला जीओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सिक्युरिटी (Jio Security), जिओ क्लाऊड (Jio Cloud) आणि जिओ टीव्हीचे (Jio TV) कॉम्प्लिमेंट्री सबस्क्रिप्शन मिळणार आहेत. हे रिचार्ज प्लॅन विकत घेणाऱ्या युझर्सला 5 जीबी डेटासाठी एलिजिबल असतील. या अॅप्सच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सुरक्षा, डेटा सेव्हिंग आणि मालिकांसारख्या सुविधा युझर्सला मोफत वापरता येणार आहेत.


स्पर्धा वाढली


सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेट प्लॅन्समध्ये 'जिओ'चे प्लॅन्स हे सर्वात स्वस्त प्लॅन्सपैकी आहेत. त्यातच आता या नवीन प्लॅन्समुळे 'जिओ'ने स्पर्धक कंपन्यांचं या क्षेत्रातील आव्हान अधिक वाढवलं आहे. मात्र कंपन्यांच्या या प्राइज वॉरमध्ये युझर्सला फायदा होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये 'जिओ'बरोबरच व्होडाफोन-आयडिया, एअरटेल यासारख्या काही मोजक्यात कंपन्या स्वस्त इंटरनेट सेवा पुरवण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र या सर्वांमध्ये 'जिओ' अनेक अर्थांनी स्पर्धकांपेक्षा अधिक सरस असल्याचं सध्या तरी पहायला मिळत आहे.