नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपला मोफत फिचर फोन लॉन्च केल्यावर ग्राहकांच्या या फोनकडे नजरा लागल्या आहेत. हा फोन घेण्यासाठी १५०० रूपये डिपॉझिट करावे लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, हे पैसे ३ वर्षांनी परत मिळतील, अशी घोषणा कंपनीने केली होती. आता या फिचर फोनसाठी कंपनी रिफन्ड पॉलिसीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्याद्वारे ग्राहकांना तीन वर्षांच्या ठरलेल्या कालवधीपूर्वीच हॅंडसेट परत करता येईल आणि त्याबदल्यात डिपॉझिट केलेल्या रकमेचा एक भाग परत केला जाणार नाही. 


इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जिओ ग्राहकांना तीन वर्ष पूर्ण होण्याआधी फोन परत करण्याचा पर्याय देऊ शकते. या स्कीममध्ये कंपनी सांगू शकते की, ६ महिने किंवा एक वर्षाने हा फोन परत केला तर ग्राहकांना डिपॉझिट केलेल्या रकमेपैकी किती रक्कम परत मिळेल. 


काही दिवसांनी या रिफन्ड स्कीमची घोषणा केली जाऊ शकते. जिओ फोन १५ ऑगस्टपासून बीटा टेस्टींगसाठी उपलब्ध आहे. आणि याची प्री-बुकींग २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विश्लेषकांना असं वाटतं की, या फोनवर मिळत असलेल्या १५३ रूपयांच्या ऑफरमुळे या फोनला जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अशातच कंपनी रिफन्ड पॉलिसीची घोषणा करण्याची शक्यता आहे.