Jio Motive: प्रत्येक शहरांमध्ये कारचोरीच्या घटना सर्रास घडत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, डुप्लीकेट चावी बनवून किंवा लॉक तोडून कार पसार करणे किंवा कारमधील सामान लंपास करणे अशा घटना वारंवार समोर येत असतात. पण आता या चोरांचे दुकान कायमचे बंद होणार आहे. कारण जिओने एक खास प्रोडक्ट बाजारात आणले आहे. जे तुमच्या किंमती वस्तुंची रक्षा करु शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओने खास डिवाइस लॉंच केले असून ते तुमच्या कारची रक्षा करेल आणि तुम्हाला कार चोरांपासून वाचवेल. याची किंमत 5 हजारपेक्षाही कमी आहे. हे डिवाइस तुम्हाला रिलायन्स डिजिटल, अमेझॉन अशा ई कॉमर्स वेबसाइटवरुन खरेदी करता येणार आहे. 
हे डिवाइस तुम्ही तुमच्या कारमध्ये लावून कारची सुरक्षा वाढवू शकता.


जिओ मोटीव्हसोबत तुम्हाला एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्यानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.  जिओने नव्या कारच्या ट्रॅकरसाठी 10 टक्के डिस्काऊंट दिले आहे. तुम्हीदेखील या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे. 


कसे कराल कनेक्ट?


जिओ मोटीव्ह कनेक्ट करणे खूपच सोपे आहे. कारच्या ओबीडी पोर्टवरुन तुम्ही हे कनेक्ट करु शकता. हे एक स्टॅंडर्ड डिव्हाइस आहे. जे स्टेअरिंग व्हिलच्या खालच्या भागात ठेवले जाते. या जिओ डिवाइसमुळे 4जी जीपीएस ट्रॅकींगची सुविधा मिळते. हे तुमच्या कारचे लाईव्ह लोकेशन दाखवते. 


कार निघाल्यावर तसेच परत घरच्या ठिकाणी आल्यावर आपल्या लोकेशनचा अलर्ट मालकाला पाठवेल.  या डिवाइससमोबत गाडीचा हेल्थ ट्रॅक मिळतो. यूजर्सना एक डेडिकेटेड अॅपहून डायग्रोस्टिक ट्रबल कोड (डीटीसी) अलर्ट मिळतो. त्या माध्यमातून कारचा ड्रायव्हिंग आणि कारचा रस्त्यावरील परफॉर्मन्स कळतो. चांगल्या कनेक्टीव्हीटीसाठी यामध्ये बिल्ट इन वायफाय ही सुविधा मिळते. हे डिवाइस खास करुन जिओ सिमसोबत कनेक्ट करता येईल.