जिओच्या प्राईम ग्राहकांसाठी ट्रिपल कॅशबॅक ऑफर....
![जिओच्या प्राईम ग्राहकांसाठी ट्रिपल कॅशबॅक ऑफर.... जिओच्या प्राईम ग्राहकांसाठी ट्रिपल कॅशबॅक ऑफर....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/11/09/253787-177307-jio-offer1.jpg?itok=AoWj3int)
जिओच्या विविध ऑफर्समुळे मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरु आहे. एअरटेलने आपले काही खास प्लॅन्स सादर केले. तसेच अनेक विविध प्लॅन्स इतर कंपन्यांनी देखील सादर केले. मात्र आता जिओने प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : जिओच्या विविध ऑफर्समुळे मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरु आहे. एअरटेलने आपले काही खास प्लॅन्स सादर केले. तसेच अनेक विविध प्लॅन्स इतर कंपन्यांनी देखील सादर केले. मात्र आता जिओने प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे.
या प्लॅन्समध्ये जिओ आपल्या विशेष ग्राहकांना अनेक सुविधांसह २५९९ रुपये नकदी स्वरूपात कॅशबॅक देणार आहेत. ज्याचा वापर तुम्ही काही ठराविक जागी खरेदी करताना करू शकता. कंपनीने सांगितले की, अमेजनपे, पेटीएम व फोनपे यांसारख्या अनेक कंपन्यांशी जिओने हातमिळवणी केली आहे. या प्लॅनमध्ये प्राईम ग्राहकांना ३९९ रुपये व त्याहून अधिक रूपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचे व्हाउचर मिळेल. तर जिओचे पार्टनर प्रत्येक रिचार्जवर ३०० रुपये तात्काळ कॅशबॅक देतील.
कंपनीने सांगितले की, 'अजियो डाट कॉम' वर १५०० रुपयांची खरेदीवर जिओ ग्राहकांना ३९९ रुपयांची सूट दिली जाईल. तर यात्रा डॉट कॉमवर विमान तिकीट खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळेल. रिलायंसट्रेंड्स वर १९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट कंपनीच्या प्राईम ग्राहकांना मिळेल. या संधीचा लाभ जिओ प्राईम ग्राहकांना १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत घेता येईल.
ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी दूरसंचार कंपन्या नवनवीन योजना जाहीर करत आहेत. वोडाफोन, एअरटेलने देखील अलीकडेच त्यांच्या नव्या योजना जाहीर केल्या.