अंबानींकडून अजून काय हवं! Jio कडून लाखो युजर्सना गिफ्ट, तुम्हीच निवडा VIP नंबर, काय आहे प्रक्रिया?
जिओने (Jio) आपल्या लाखो युजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही नवा आणि खास नंबर मिळवू शकता. कंपनीने एक नवी सेवा सुरु केली आहे ज्याचं नाव `Choice Number` अशी ठेवण्यात आली आहे.
Jio ने आपल्या लाखो यूजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही नवा आणि खास मोबाईल नंबर मिळवू शकता. जिओने ‘Choice Number’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत, युजर्स त्याच्या पसंतीचे क्रमांक निवडून विशिष्ट मोबाईल नंबर मिळवू शकतात. तुमचा वाढदिवस, लकी क्रमांक किंवा कोणतीही खास तारीख तुम्ही मोबाईल नंबरसाठी निवडू शकता. म्हणजेच घरसबल्या तुम्ही व्हीआयपी नंबर मिळवू शकता. या सेवेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल जाणून घ्या.
जिओच्या Choice Number सेवेचा लाभ कसा घ्यायचा हे जाणून घ्या. यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. जिओ वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलसाठी व्हीयआपी नंबर मिळवू शकता.
1. Jio वेबसाइट:
- सर्वात आधी जिओच्या अधिकृत बेबसाईटवर जा. [Jio Choice Number](https://www.jio.com/selfcare/choice-number/).
- होमपेजवर "Choice Number" पर्याय उपलब्ध असेल, त्यावर क्लिक करा.
- तुमचा सध्याचा जिओ पोस्टपेड प्लस नंबर एंटर करा आणि OTP मिळवा.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे 4 ते 6 अंक आणि पिनकोड टाकू शकता.
- तुमच्या क्षेत्रातील उपलब्ध क्रमांकांची यादी दिसेल. यातून तुम्ही तुमच्या आवडीचा क्रमांक निवडू शकता.
- निवडलेल्या नंबरसाठी 499 रुपये भरावे लागतील. एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुमचे नवीन Jio सिम कार्ड तुमच्या घरी मोफत वितरित केले जाईल.
2. MyJio ॲपद्वारे:
- तुमच्या स्मार्टफोनवर MyJio ॲप उघडा.
- मेन्यू सेक्शनमध्ये विभागात जा आणि "नंबर निवडा" पर्याय निवडा.
- "Let’s book now" वर क्लिक करा.
- तुमच्या आवडीचे 4 ते 5 क्रमांक, पिनकोड आणि नाव टाका.
- "Show available numbers" वर क्लिक करा.
- ॲप तुम्हाला उपलब्ध क्रमांकांची यादी दाखवेल. यामधून तुम्ही तुमचा आवडता क्रमांक निवडू शकता.
- निवडलेल्या नंबरसाठी 499 रुपयांचं पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर, तुमचे नवीन Jio सिम कार्ड तुमच्या घरी मोफत वितरित केले जाईल.
काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- Choice Number सेवा फक्त Jio पोस्टपेड प्लस यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
- तुम्ही फक्त त्याच पिनकोड क्षेत्रातील नंबर निवडू शकता जिथे तुम्ही सध्या वास्तव्यास आहे.
- Jio कोणत्याही विशेष क्रमांकाची गॅरंटी देत नाही. नंबर उपलब्ध असेल तरच तुम्हाला तो नबंबर मिळेल.