मुंबई : रिलायन्स जिओ फोन २ आपल्या पुढच्या फ्लॅश सेलसाठी सज्ज झालायं. आजपासून जिओ फोनचा सेल सुरू झालायं. jio.com वर १२ वाजल्यापासून हा सेल सुरू झालायं. ४१ व्या वार्षिक सभेत मुकेश अंबानी यांनी हा फोन लॉंच केला होता. या फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ रुपये असून रिलायन्स जिओ सिम सपोर्टवरच हा फोन चालतो.


स्पेशल ऑफर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फिचर फोनसाठी कंपनीने स्पेशल रिचार्ज ऑफरही आणली आहे. जिओ फोनसाठी ४९ रुपये, ९९ रुपये आणि १५३ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हा फोन नोकियाच्या जुन्या आशा फोनप्रमाणेच दिसतो. 


स्टोरेज  


 जिओ फोन २ मध्ये २.४ इंच स्क्रिन आणि क्वार्टी किपॅड उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. 


खास फिचर्स  


जिओ फोन २ मध्ये २ मेगा पिक्सल कॅमेरा आहे. फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी ०.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला गेलायं. हा फिचर फोन KAT OS वर काम करतो. फोनमध्ये २००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जिओ फोन २ मध्ये ४ जी VoLTE, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम सारखे फिचर्सही उपलब्ध आहेत.