नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका झालाय. जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी दररोज नव्या ऑफर्स दिल्या जात आहेत. रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांसाठी एक सिक्रेट कोड घेऊन आले आहेत. जिओच्या ग्राहकांना हा सिक्रेट कोड चांगला फायद्याचा ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ वापरणा-यांना जर नेहमी नेटवर्कची अडचण येत असेल. त्याच्या अनेक तक्रारीही केल्या असतील पण तरीही समाधान होत नाही. कॉल ड्रॉप, फोन कनेक्ट होत नाही, मेसेज डिलिव्हर होत नाही यांसारख्या नेहमीच येतात. यासाठी एक असा कोड आहे ज्यामुळे जिओ ग्राहकांना या समस्या भेडसावणार नाहीत. 


काय आहे सिक्रेट कोड?


जिओ यूजर्ससाठी हा *409* कोड आहे. हा एक स्पेशल कोड आहे. याच्या मदतीने जिओ नंबरला कोणत्याही दुस-या नंबरवर फॉरवर्ड केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही नेटवर्कमध्ये असोत वा नसो तुमचा कोणताही कॉल मिस होणार नाही. नेटवर्क येत नसले तरी तुम्हाला जिओवर येणारे कॉल दुस-या नंबरवर येतील. पण यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागेल. 


असा करा कोडचा वापर


फोन डायलर डायल करा. त्यानंतर ज्या नंबरवर कॉल फॉरवर्ड करायचा आहे तो नंबर टाईप करा आणि डायल करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या जिओ नंबरवर कॉल लागत नसल्यास दुस-या नंबरवर कॉल येतील. याने जिओवर कॉल लागत नसल्याची समस्या येणार नाही. 


ही सेवा अशी करा बंद


जर जिओ यूजर्सना आपली कॉल फॉरवर्डींगची सेवा बंद करायची असेल तर सोपी पद्धत आहे. ही सेवा बंद करण्यासाठी तुम्हाला *410 डायल करावा लागेल. यानंतर ही सेवा बंद होईल.