मुंबई : टेलिकॉम सेक्टरमध्ये जेव्हा रिलायन्स जिओने प्रवेश केला होता, तेव्हापासून जिओ सतत दुसऱ्या कंपन्यांना टक्कर देत आहे. दुसऱ्या कंपन्या देखील या शर्यतीत पुढे जाण्यासाठी नवनवीन कल्पना घेऊन येत आहेत. या स्पर्धेचा सामना सरळ ग्राहकांना होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिलो टक्कर देण्यासाठी वोडाफोन आणि एअरटेलने देखील आप आपल्या प्लानमध्ये बदल करत आले आहेत, आता या कंपन्यांचे आम्ही तुम्हाला खाली असे प्लान देत आहोत, जे रिचार्ज केल्यानंतर तुम्ही ३ महिने बिनधास्त राहू शकतात. म्हणजे या ३ महिन्या दरम्यान, ना तुम्हाला इंटरनेट पॅक रिचार्ज करावा लागतो, ना कॉल करण्यासाठी रिचार्ज करावा लागतो.


जियो


प्लान - 498 रुपये
वॅलिडीटी - 91 दिन
इंटरनेट - 2 जीबी हायस्पीड डेटा दररोज
कॉलिंग - अनलिमिटेड
रोमिंग - फ्री
मेसेज - 100 SMS/Day
जर दिवसाला २ जीबीची मर्यादा संपली तरी तुम्हाला, फ्री डेटा मिळेल, पण त्याचा 64 kbps स्पीड असेल. याशिवाय तुम्हाला यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, आणि जिओ म्युझिक अॅप देखील फ्री मिळेल.


वोडाफोन


प्लान - 509 रुपये
वॅलिडीटी -  90 दिन
इंटरनेट - 1.4 जीबी हायस्पीड डेटा दररोज
कॉलिंग - अनलिमिटेड
रोमिंग - फ्री
मेसेज - 100 SMS/Day
या सुविधेसह वोडाफोनचा ५२९ रूपयांचा देखील पॅक आहे. यात आपल्याला १.४ जीबीच्या जागी, १.५ दररोज मिळणार आहे.


एयरटेल


प्लान - 509 रुपये
वॅलिडीटी - 90 दिन
इंटरनेट - 1.4 जीबी हायस्पीड डेटा दररोज
कॉलिंग - अनलिमिटेड
रोमिंग - फ्री
मेसेज - 100 SMS/Day
आता तुम्हीच याचा निर्णय घ्या, की तुमच्यासाठी कोणता पॅक योग्य असेल, पण त्याआधी त्या पॅकची संपूर्ण माहिती घ्या, तेव्हाच रिचार्ज करा.