Prepaid Plans under Rs 200 Jio Airtel Vi: सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. काही लोकांना यातलं काही कळत नाही असे लोक साधा फोन तरी वापरतात. त्यामुळे रिचार्ज करणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत असतो. कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे मिळवण्याचा हेतू असतो. भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन प्रमुख खासगी दूरसंचार कंपन्या आहे. या कंपन्यांचे आकर्षक प्लान असून कमी खर्चाच जास्तीत जास्त फायदे देतात. पण तीन कंपन्यांपैकी बेस्ट प्लान कोणता? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्लानबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात कोणत्या कंपनीचा प्लान सर्वात बेस्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Airtel: एअरटेलमध्ये पहिला प्लान 155 रुपयांचा आहे. या प्लानची ​​वैधता 24 दिवसांची आहे.  या प्लानमध्ये 300 SMS, 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, HelloTunes आणि Wynk Music चे सदस्यत्व यासारखे अतिरिक्त फायदे आहेत. एअरटेल दुसरा प्लान 179 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये 2GB हाय स्पीड इंटरनेट, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 300 SMS, HelloTunesआणि Wynk म्युझिकचे सदस्यत्व मिळते. या प्लानची ​​वैधता देखील 24 दिवसांची आहे.


Jio: जिओच्या 149 रुपयांच्या प्लानची वैधता 20 दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहेत. जिओचा दुसरा प्लान 179 रुपयांचा असून त्याची वैधता 24 दिवसांची आहे. कोणत्याही नेटवर्कवर 100 एसएमएस आणि दररोज 1GB डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा दिली जात आहे. 


Royal Enfield चा दिवाळी धमाका, लाँच करणार 3 जबरदस्त बाइक, जाणून घ्या फीचर्स


VI: व्होडाफोन आयडिया किंवा Vi 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचे दोन प्लान ऑफर करते. पहिला प्लान 179 रुपयांचा असून या प्लानमध्ये 300 एसएमएस, 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा आहे. वैधता 28 दिवसांसाठी दिली जात आहे. या प्लानमध्ये Vi Movies आणि TV चे सदस्यत्व देखील समाविष्ट आहे. Vi चा दुसरा प्लान 195 रुपयांचा आहे. यामध्ये 300 SMS, 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचे फायदे Vi Movies आणि TV वर अॅक्सेस दिले जात आहेत. या प्लानची ​​वैधता एक महिन्याची आहे.