मुंबई : जिओ, वोडाफोन, आणि एअरटेलचे स्वस्त प्रीपेड प्लान्स, तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग डाटाचाही तुम्हाला लाभ होवू शकतो. या प्लान्सची किंमत २६० रूपयांपेक्षा कमी आहे. तर जाणून घेऊ या, या तीन टेलिकॉम कंपन्यांच्या परवडणाऱ्या प्लान विषयी. दिवसेंदिवस कंपन्या आपले प्लान सतत बदलत असतात, याविषयी आपण सतत माहिती घेतल्यास आपल्याला लाभ होतो आणि पैस देखील वाचतात.


वोडाफोन २५५ रूपयांचा प्लान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोनच्या या प्रीपेड प्लानमध्ये युझर्सना २८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या प्लानवर देशभरातील वोडाफोन ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेतात.


एवढंच नाही, यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग असेल, तसेच दिवसाला २ जीबी हायस्पीड डेटा देखील मिळणार आहे. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएसचा देखील फायदा होणार आहे.


तसेच वापरकर्त्याला टीव्ही स्ट्रिमिंग पाहता येईल, पण प्ले अॅपलच्या माध्यमातून.


एअरटेलचा २४९ रूपयांचा प्लान


भारती एअरटेल प्लान वापरकर्त्यांना २८ दिवसांची मुदत देते, यात देशभरात एअरटेलचा ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर फोन करून अमार्यादीत बोलू शकतो.


या प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह, २ जीबी हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० एसएमएस देखील फ्री आहेत.


रिलायन्स जिओचा १९९ रूपयांचा प्लान


रिलायन्स जिओचा १९९ रूपयांचा प्लान आहे, यात ग्राहकाला सर्व लाभांसाठी, १९९ दिवसात २८ दिवसांची मुदत दिली जाते.


यात देशभरात एअरटेलचा ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर फोन करून अमार्यादीत बोलू शकतो.


या प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह, २ जीबी हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० एसएमएस देखील फ्री आहेत.