मुंबई : जर तुमच्याकडे रिलायन्स जिओचं सिम असेल तर ही तुमच्यासाठी  अतिशय आनंदाची बातमी आहे. समर सरप्राइज आणि धन धना धन ऑफर संपण्यापूर्वी जिओकडून आणखी काही नवीन टेरिफ प्लान आणण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओचे हे नवीन प्लान 21 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. वार्षिक बैठकीत याची घोषणा होणार आहे. धन धना धन ऑफर शिवाय जिओचा 150 रुपये / महिनाच्या प्लॅन देखील आहे. अशातच 80-90 रुपयांचा प्लान देखील लाँच केला जाऊ शकतो. हा प्लॅन 28 दिवसाचा असेल. यामध्ये डेटा, वॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळले.


जिओने त्यांच्या प्राइम मेंबर्ससाठी ज्यांनी 99 रुपयांचा रिचार्ज केला होता. त्यांच्यासाठी 309 आणि 509 रुपयांचा प्लान आणला आहे. ज्यामध्ये विनामूल्य वॉईस, एसएमएस, जिओ अॅप आणि 1 किंवा 2 जीबी डेटा रोज दिला जात आहे.