Jiocinema Merger With Disney+ Hotstar : आज सर्वत्र OTT चा बोलबाला आहे. एक मोठा वर्ग आज OTT च्या विश्वात रमलेला दिसतो. आज टीव्ही असो मोबाईल, अगदी लॅपटॉपवर OTT माध्यमातून मनोरंजनाची दुनिये प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतात. अशातच जेव्हा रिलायन्स जिओने OTT प्लॅटफॉर्म 'जिओ सिनेमा' वर IPL मोफत दाखवण्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण बाजारात धुमाकूळ झाला होता. आता मुकेश अंबानींनी अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर तुम्ही JioCinema आणि Disney Hotstar यूजर्स असला तर ही बातमी महत्त्वाची आहे. 


Jio सिनेमा बंद होणार का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्रीजने डिस्ने हॉटस्टारचे मालकी हक्क विकत घेतलंय. Star India आणि Viacom18 च्या विलीनीकरणानंतर, आता कंपनीने निर्णय घेतला आहे की डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमाचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. यानंतर नवीन प्लॅटफॉर्मचं नाव डिस्ने हॉटस्टार असणार आहे. विलीनीकरणानंतर, कंपनीकडे सुमारे 100 चॅनेल आणि 2 स्ट्रीमिंग सेवा असणार आहेत. 


माहितीनुसार, Disney + Hotstar चे Google Play Store वर 50 कोटींहून अधिक डाउनलोड करण्यात आलंय. तर Jio सिनेमाच्या डाउनलोडची संख्या ही फक्त 10 कोटी असल्याने मुकेश अंबानींनी हा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जातंय. इतकंच नाही तर डिस्ने + हॉटस्टारचे 3.55 कोटी पेड सब्सक्राइबर आहेत. अशा स्थितीत दोन्ही विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तुम्ही या नवीन विलीन केलेल्या चॅनेलमध्ये तुमचं आवडता शो पाहू शकाल. 


NCLT ने दिली मंजूर 


30 ऑगस्टला, NCLT ने Viacom 18 Media आणि Digital 18K Star India च्या विलीनीकरणाच्या योजनेला मंजुरी दिली होती. त्याचप्रमाणे, आता या नवीन विलीनीकरणामुळे एक मोठा मीडिया समूह तयार होईल, ज्याचे मूल्य 70,000 कोटींचा घरात असल्याच बोललं जातंय.