Jio च्या बजेट 5G स्मार्टफोनचं ठरलं! कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या
ल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमी स्वस्त आणि मस्त हँडसेटची आतुरतेने वाट पाहात. दरम्यान जियोने एन्ट्री लेव्हल JioPhone Next च्या यशानंतर 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे.
Jio 5G Smartphone: देशात 5G नेटवर्क सुविधा सुरु झाली असून मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. असं असलं तरी प्रत्येकाकडे 5G ला सपोर्ट करेल असा हँडसेट नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमी स्वस्त आणि मस्त हँडसेटची आतुरतेने वाट पाहात. दरम्यान जियोने एन्ट्री लेव्हल JioPhone Next च्या यशानंतर 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. या स्मार्टफोनकडे बजेट स्मार्टफोन म्हणून पाहिलं जात आहे. जर तुम्हीही परवडणारा 5G स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊया JioPhone 5G ची अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये...
JioPhone 5G मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट असलेली 6.5-इंच HD+ IPS LCD स्क्रीन असू शकते. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 5G चिपसेटसह सुसज्ज असू शकतो. तसेच 32GB स्टोरेजसह जोडला जाऊ शकतो. यात 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह मागील ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. JioPhone 5G मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यात काही Jio अॅप्स तसेच Google Play सेवांसह देखील येऊ शकतात.
जिओ कंपनीने JioPhone Next हा स्मार्टफोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6,499 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. JioPhone 5G हा सुद्धा बजेट स्मार्टफोन असेल, तर 10,000 रुपयांच्या कमी किमतीत असेल अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या या स्मार्टफोनची किंमत गुलदस्त्यात आहे. सोशल मीडियावरील लीकनुसार, स्मार्टफोन जियोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाँच केला जाऊ शकतो. पण कंपनीने फोनबद्दल काहीही सांगितलेले नाही. किंमत आणि वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी लाँच होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.