Mosquito Killer App: आधुनिक युगात स्मार्टफोन सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून आपली काम चुटकीसरशी पूर्ण होत आहे. लोकल रेल्वेचं टायमिंग ते तिकीट बुकिंगपर्यंतच्या बाबी झटपट एका क्लिकवर होत आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी काय अपडेट येतील सांगता येत नाही? पण सध्या मोबाईलमधील एक अ‍ॅप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही डास पळवून लावू शकता. जर तुम्हाला हे अशक्य वाटत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पावसाळा असून ठिकठिकाणी पाणी साचतं. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. तसेच मोठ्या प्रमाणात मलेरिया, डेंग्यु या सारखे आजार पसरतात. त्यामुळे घरात डास असले की धडकी भरते. आता डासांची चिंता न करता तुमच्या मोबाईलमध्ये डास पळवून लावणारं अ‍ॅप डाऊनलोड करा. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवर उपलब्ध आहे. डास पळवून लावणारे सर्व अ‍ॅप एक सारखंच काम करतात. 


अ‍ॅप डेव्हलपरने दावा केला आहे की, हे अ‍ॅप ऑन करताच डास आसपास फिरकणार नाहीत. हे अ‍ॅप लो फ्रीक्वेंसी साउंड्स प्रोड्यूस करते. यामुळे डास पळून जातात. या अ‍ॅपमध्ये लो फ्रीक्वेंसी अल्ट्रासोनिक साउंड पर्याय निवडू शकता. या आवाजाची तीव्रता कमी असल्याचा दावा अ‍ॅप करतात. पण खरंच हे अ‍ॅप डास पळवून लावतात का? चला तर मग याबाबत जाणून घेऊयात


खरं तर हे अ‍ॅप तितके प्रभावी नसल्याचा दावा अनेक वापरकर्त्यांनी केला आहे. तसेच आवाजाबाबतही तक्रार केली आहे. तसेच हे अ‍ॅप सुरु केल्यानंतर अनेक जाहिराती पॉपअप होत असतात. त्यामुळे डासांच्या त्रासासोबत न आवडत्या जाहिराती पाहाव्या लागतात. त्यामुळे हे अ‍ॅप फक्त जाहिरातींसाठी बनवले असल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे डेव्हलपरला चांगलं उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर असे अ‍ॅप ऑथेंटिक आहे की नाही? हा प्रश्नही असतो. याचा फायदा घेऊन स्कॅमर मॅलवेअर फोनमध्ये इन्स्टॉल करू शकतात.