Second Hand Car Purchase Tips: सेकंड हँड कार स्वस्त असल्याने या गाड्या खरेदीकडे लोकांचा कल असतो. लाखोंच्या गाड्या कमी किमती मिळतात. पण सेकंड हँड कार खरेदी करणं देखील महागात पडू शकतं. सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक आहे. सेकंड हँड कार खरेदी करताना पूर्ण तपासणी करून घ्या. बरेचदा लोक गाडीची योग्य देखभाल न करता कार खराब अवस्थेत पोहोचल्यावर विकून टाकतात. त्यामुळे अशी कार खरेदी केली तर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. म्हणून सेकंड हँड कार खरेदी करताना तुम्हाला पाच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजिन: कारचे इंजिन हा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. कारण यात काही अडचण आल्यास त्याची किंमत तुम्हाला खूप महागात पडू शकते. म्हणूनच सेकंड हँड कार घेण्यापूर्वी एखाद्या मेकॅनिकला कारचे इंजिन दाखवा. तुमचा विश्वास असलेल्या मेकॅनिकला दाखवा. जेव्हा तो इंजिन पास करेल, तेव्हाच वाहन खरेदी करण्याचा विचार करा.


सस्पेंशन और स्टीयरिंग: कारचे सस्पेन्शन आणि स्टीयरिंग देखील तपासा. यापैकी कशाचाही आवाज येत असेल तर तपासणी करा. कारचे हे दोन्ही भाग खूप महाग आहेत. जर तुम्हाला कार खरेदी केल्यानंतर बदलण्याची वेळ आली तर तुम्हाला खूप महागात पडू शकते.


इलेक्ट्रिकल्स: जेव्हा तुम्ही वापरलेली कार खरेदी करायला जाल तेव्हा मेकानिकला सोबत घ्या आणि त्याला कारची इलेक्ट्रिकल्स पार्ट दाखवा. काही काळानंतर, कारचे इलेक्ट्रिकल्स पार्ट निकामी होऊ लागतात. यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 


रस्टिंग: कधीकधी जुन्या गाड्यांमध्ये गंज लागलेला असतो. कारण कार एका जागेवर खूप दिवस उभी राहिल्याने पाण्यात सतत भिजते, ज्यामुळे त्याच्या लोखंडी भागांना गंज लागतो. म्हणून, सर्व बाजूंनी कारची तपासणी करा. जर तुम्हाला गंज जास्त असेल तर अशी गाडी खरेदी करु नका.


कागदपत्रं: गाडी खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रं तपासून घ्या. कारण पुढे जाऊन तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. समोरच्या व्यक्तींने तुमची फसवणूक केली तर पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. हे काम तुम्ही स्वतः करू शकत नसाल, तर तुम्ही संबंधित आरटीओमध्ये जाऊनही कागदपत्रे तपासू शकता.