Kia Carnival: लक्झरी कार, जबरदस्त लूक, इंटिरियर आणि डिझाइन यासह Kia ची प्रसिद्ध एमपीव्ही Carnival मध्ये ग्राहकांना अपेक्षित असणारी प्रत्येक गोष्ट होती. पण विक्रीच्या बाबतीत ही कार ग्राहकांवर ती जादू करु शकली नाही, जे इतर ब्रँडच्या मॉडेल्सना शक्य झालं. यामुळे कंपनीने अखेर ही कार भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण कंपनीन वेबसाइटवरुन गाडी हटवली आहे. तसं डिलर्सच्या सूत्रांनीही याबाबत काही सांगितलेलं नाही. 


60 दिवसांत एकही गाडी विकली गेली नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन महिन्यात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात Kia Carnival च्या एकाही युनिटची विक्री झालेली नाही. सुरुवातीचे महिने मात्र या कारसाठी चांगले होते. जानेवारी महिन्यात या कारच्या 1003 युनिट्सची विक्री झाली होती. पण पुढील महिने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यात घट झाली आणि अनुक्रमे 504 आणि 168 युनिट्सची विक्री झाली. या लक्झरी एमपीव्हीची मागणी वारंवार कमी होत होती. कदाचित याचमुळे कंपनीने ही कार बाजारातून हद्दपार केली आहे. 


Kia ने 2019 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्यावेळी ब्रॅण्डने भारतात आपल्या प्रवासाची सुरुवात करताना Seltos सह केली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने Carnival ला लाँच केलं होतं. त्यावेळी एमपीवीची किंमत 24 लाख 95 हजार रुपये ठेवण्यात आली होती. नंतर याची किंमत 25 लाख 15 हजार ते 35 लाख 49 हजारांपर्यंत आली होती. कंपनी या कारला कम्प्लीट नॉक डाउन मार्गाने भारतात आणलं जात होतं आणि नंतर स्थानिक स्तरावर असेंबल केलं जात होतं. 


भारतात ज्या Carnival ची विक्री केली जात होती, ते थर्ड-जनरेशन मॉडेल होतं. जून 202 मध्ये कंपनीने फोर्थ जनरेशन मॉडेलला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सादर केलं होतं. पण ही कार मार्केटमध्ये आल्यानंतर काही महिन्यातर करोनाने थैमान घातलं होतं. याचा परिणाम कारच्या विक्रीवर झाला होता. याशिवाय कंपनीही कारचं पुढील मॉडेल बाजारात आणण्यास फार उत्सुक नव्हतं. कारण कंपनीने नुकतंच थर्ड जनरेशन मॉडेल लाँच केलं होतं.


Kia Carnival ला भारतीय बाजारपेठेत एकूण तीन ट्रिम्समध्ये सादर केलं होतं. यामध्ये प्रेस्टीज, लिमोसिन आणि लिमोसिन प्लस यांचा समावेश होता. ही कार 6 आणि 7 सीटच्या दोन लेआऊटमध्ये उपलब्ध होती. कंपनीने या कारमध्ये 2.2 लीटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला होता, जे 200 पीएसची पॉवर आणि 440 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 8 स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. 


ही कार थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल पॅनेल सनरुफ, 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि मधील सीटवाल्यांसाठी 10.1 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले या सुविधा देण्यात आल्या होत्या. तसंच सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल आणि हिल असिस्ट असे फिचर्स देण्यात आले होते.