Top-5 Waterproof Smartphones: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी स्क्रीनगार्डसह कव्हर वगैरे घातलं जातं. मात्र अनेकदा इतकी काळजी घेऊन साध पाणी पडलं की फोन खराब होऊन जातो. आता पावसाळा सुरु असल्याने प्रत्येकाला आपल्या स्मार्टफोनची काळजी आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्यामध्ये फोन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण बाजारात काही स्मार्टफोन असे आहेत की त्या फोनची पावसाळ्यात काळजी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच हे स्मार्टफोन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत. या स्मार्टफोनवर पाणी पडलं तरी ते खराब होत नाहीत. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Samsung Galaxy S21 Ultra हा S21 मालिकेतील प्रीमियम फोनपैकी एक आहे. उत्कृष्ट प्रोसेसर आणि स्पेक्स असलेली अॅल्युमिनियम फ्रेम आहे. तुम्हाला दोन्ही बाजूंनी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण देखील दिलेले आहे. IP68 रेटेड वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससह तुम्ही हा फोन पाण्याखाली सहजपणे वापरू शकता. डिव्हाइस 5G सपोर्टेड असून 108MP बीस्ट कॅमेरासह एक जबरदस्त 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे.

  • iPhone 13 Pro Max हा भारतातील सर्वोत्तम वॉटरप्रूफ फोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन IP68 सह येते. हा फोन जास्तीत जास्त 20 फूट (6 मीटर) पर्यंत 30 मिनिटे पाण्याखाली सोडू शकता. तुम्ही त्याच्या Pro 12MP कॅमेरा सिस्टम (अल्ट्रा वाइड, वाइड आणि टेलिफोटो) सेटअपसह पाण्याखालील फोटोग्राफी करू शकता. याशिवाय, तुम्हाला 6GB RAM सह जलद Apple A15 Bionic प्रोसेसर दिला आहे. Apple 2778 x 1284 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा HDR10 डिस्प्ले दिला आहे.

  • OnePlus 9 Pro हे OnePlus कडून डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस असलेले नवीनतम लॉन्च केलेले फ्लॅगशिप डिव्हाइस आहे. हे IP68 रेटिंगसह येते, जे सुनिश्चित करते की तुम्ही हा फ्लॅगशिप फोन पाण्याखाली देखील वापरू शकता. हा फोन अप्रतिम 120Hz Fluid2 AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह येतो. हा फोन 256GB UFS 3.1 स्टोरेज आणि 12GB RAM सह मिळतो. या स्मार्टफोनची किंमत 65,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

  • Google Pixel 6 Pro IP68 फोन 30 मिनिटांसाठी जास्तीत जास्त 1.5 मीटर पर्यंत पाण्यात ठेवू शकता. यात अगदी अत्याधुनिक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. कॉम्पॅक्ट डिझाइन आणि वॉटरप्रूफ क्षमतेचे सर्वोत्तम संयोजन आहे. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम वॉटरप्रूफ मोबाईलपैकी एक आहे.

  • IP68 जल-प्रतिरोधक क्षमता असलेला हा एक उत्तम फोन आहे. याचा परफॉर्मन्स चांगलं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या डिव्‍हाइसचा कॅमेरा कमालीचा उत्कृष्ट आहे, जो तुम्हाला अप्रतिम फोटो क्लिक करतो. तुम्ही Amazon वरून 1,19,900 रुपयांना खरेदी करू शकता.