नवी दिल्ली : फेस्टिव्हल सीजनमध्ये शाओमीने Diwali with Mi सेलचं आयोजन केलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीकडून ग्राहकांना बंपर डिस्काऊंट आणि इतर काही ऑफर्स देण्यात येत आहे. डिस्काऊंटसह ग्राहकांना No-Cost EMI, एक्सचेंज ऑफर, कमी किंमतीत डिवाइस प्रोटेक्शन प्लान असे ऑप्शन देण्यात येत आहेत. Diwali with Mi सेल शाओमीच्या वेबसाइट mi.comवर आजपासून सुरु होत असून २५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलमध्ये शाओमीकडून त्यांच्या स्मार्टफोनवर १२ हजार रुपयांचा, टीव्हीवर १० हजार रुपयांचा तर इतर ऑडिओ ऍक्सेसरीजवर ५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. 



सेलदरम्यान दररोज १२ वाजता कंपनीचे तीन स्मार्ट टीव्ही  Mi TV 4X (43 इंच),  Mi TV 4X (50 इंच) आणि  Mi TV 4X (65 इंच) यावर डिस्काऊंट मिळणार आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही भारतात काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले आहेत. २४ हजार ९९९ या सुरुवातीच्या किंमतीपासून स्मार्ट टीव्ही ग्राहक खरेदी करु शकतात. 


Mi च्या इयरफोनवरही ५०० रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. Xiaomi Diwali with Mi सेलमध्ये कॅमेरा, स्मार्ट बल्ब, पॉवरबँक, ट्रिमर, शूज यावरही डिस्काऊंट देण्यात आला आहे. 


  


दिवाळी सेलमध्ये Redmi Note 7 Pro, Redmi 7A, Redmi Y3, Redmi K20 Pro, Redmi K20, Poco F1 या स्मार्टफोनसह इतरही काही फोनवर डिस्काऊंट आहे. 


ग्राहक Mi.comवरुन प्रोडक्टबाबत अधिक ऑफर्स, डिस्काऊंटबाबतची माहिती मिळवू शकतात.