Lamborghini Urus Performante, नवी दिल्ली :  Lamborghini ने भारतात आपली नवीन SUV Urus Performante ही जबरदस्त कार लाँच केली आहे.  ही कार  3.3 सेकंदात 100 चा स्पीड घेणार आहे. या कारचा  टॉप स्पीड 306 किमी प्रतितास इतका आहे. फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये ही कार लाँच करण्यात आली होती. यानंतर ही भारतात कधी लाँच होणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून या बहुचर्चित कारने भारतीय बाजारपेठेत एन्ट्री घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारची किंमत 4.22 कोटी इतकी आहे. डिजाईन आणि परफॉर्ममन्सच्या बाबतीत Lamborghini कार नेहमीच टॉप रेटिंगमध्ये असते. Lamborghini ही लक्जरीयस व्हेअ्कल कॅटेगरीमध्ये येते.  ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 


Lamborghini Urus Performante चे बेस्ट फिचर्स


  • 4.0-लीटरचे ट्विन-टर्बो V8 इंजिन 

  • 850 Nm टॉर्क जनरेट करते

  • 666 hp पावर Urus पेक्षा 16 hp अधिक उर्जा निर्माण करते

  • स्ट्रीट, स्पोर्ट आणि ट्रॅक या तीन ड्रायव्हिंग मोडसह  रॅली मोडचा चौथा ऑप्शन देखील देण्यात आलाय

  • उंचीने लहान, 16mm रुंद आणि जुन्या Urus पेक्षा 25mm लांब 

  • कारच्या बोनेट आणि फ्रंट बंपरला कूलिंग व्हेंट्ससह जबरदस्त लुक

  • 23 इंची अलॉय व्हील