इटली : इटलीची प्रसिद्ध कार कंपनी लॅम्बोर्गिनीने आपली नवीन एसयूव्ही ‘यूरस’ ही कार बाजारात उतरवली आहे. यूरसचा अर्थ ‘जंगली सांड’ असा होतो. या आलिशान गाडीमध्ये लॅम्बोर्गिनीने अनेक खास फिचर्स दिले आहेत. चला पाहुयात काय फिचर्स आहेत.


ब-याच वर्षांपासून सुरू होतं काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हाय परफॉर्मन्स एसयूव्ही कारची निर्मिती लॅम्बोर्गिनी कंपनी ब-याच वर्षांपासून करत होती. ही ५ सीटर गाडी आहे. 


इंजिन आणि पावर


तशी तर ही कार एसयूव्ही आहे पण कंपनीला हीला एसएसव्ही म्हणजे सुपरस्पॉर्ट यूटिकल व्हेईकल मानते. ही कार फोक्सवॅगनच्या एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. लॅम्बॉर्गिनीने या कारमध्ये ४.० लीटर ट्विन टर्बो व्ही८ इंजिन दिलं आहे. हे इंजिन ६४१ बीएचपी पावर आणि ८५० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. तसेच या कारमध्ये ८ स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सिस्टम दिलं आहे. 


० ते १०० किलोमीटर प्रति तासात ३.६ सेकंदात 


ही एसयूव्ही कार ० ते १०० किलोमीटर प्रति तास स्पीड केवळ ३.६ सेकंदात पकडते. तर २०० किलोमीटर प्रति तास स्पीड १२.८ सेकंदात पकडण्यात ही कार सक्षम आहे. 


टॉप स्पीड ३०५ किलोमीटर प्रति तास


या कारचा स्पीड ३०५ किलोमीटर प्रति तास आहे. असा दावा केलाय जातोय की, ही जगातली सर्वात वेगवान एसयूव्ही आहे. ही कार विना चावी स्टार्ट होते.