What to do if water goes into a laptop:  पावसाळ्यात घरा बाहेर पडणे थोडे कठीण होऊन जाते. परंतु प्रत्येकाला कामासाठी बाहेर पडावे लागते. अनेकवेळा असे घडते की स्मार्टफोन, लॅपटॉप पिशवीत ठेवल्यानंतरही त्यात पाणी जाते. सहसा, या गॅजेट्समधून पाणी काढण्यासाठी तांदूळ किंवा केस ड्रायरसारख्या पद्धतींचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचा भिजलेला लॅपटॉप तांदळात न टाकता कोरडा करू शकाल. (Laptop got wet in rain Read this instead of just taking tension nz)


आणखी वाचा - Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


लॅपटॉप ओला असेल तर हे काम लगेच करा


जर तुमचा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये असेल तर सर्वप्रथम पॉवर बटणाच्या मदतीने तो बंद करा. यानंतर, लॅपटॉपमध्ये यूएसबी किंवा इतर ऍक्सेसरी प्लग इन असल्यास, ते सर्व अनप्लग करा. हे देखील लक्षात ठेवा की त्यावेळी तुमचा लॅपटॉप चार्जिंगवर नसला पाहिजे.


या ट्रिक्सचा वापर करा


लॅपटॉप बंद केल्यानंतर, सर्व गॅजेट्स अनप्लग केल्यानंतर, लॅपटॉप उलटा करा आणि नंतर लॅपटॉपची बॅटरी बाहेर काढा. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये हा पर्याय नसेल, तर ही स्टेप वगळा आणि नंतर मऊ कापडाच्या मदतीने लॅपटॉप पुसून टाका आणि नंतर लॅपटॉपला टॉवेलवर उलटा ठेवा. लॅपटॉपला किमान चार तास या स्थितीत ठेवा.


आणखी वाचा - Being Single : सिंगल राहण्याचेही आहेत अनेक फायदे... जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल


 


लॅपटॉप तांदळामध्ये ठेवण्याची गरज नाही


वरील प्रमाणे ट्रिकचा वापर केल्यास, तुम्ही तुमचा लॅपटॉप कोरडा करू शकाल. भिजलेला लॅपटॉप सुकवण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी त्यावर तांदूळ ठेवावा लागणार नाही किंवा लॅपटॉपला तांदळाच्या डब्यात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला लॅपटॉप सुकवण्यासाठी तुम्हाला हेअर ड्रायरचीही गरज भासणार नाही.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)