नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी लावा (Lava) इंटरनॅशनल लिमिटेडने ३ हजार ८९९ रुपये किंमतीचा नवा 'लावा झेड41' (Lawa Z41) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन मिडनाइट ब्लू आणि अंबर रेड या दोन रंगात उपलब्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लावा इंटरनॅशनल प्रोडक्ट हेड तेजिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी किंमतीतही हा स्मार्टफोन ग्राहकांना यू-ट्यूब, व्हॉट्सअप आणि फेसबुकची सुविधा देणार आहे. फोनद्वारे यूजर्स डेटा कंज्यूमिंग अॅप सर्फ शकतात. तर डेटा नियंत्रितही करु शकतात. तसंच व्हिडिओही डाउनलोड करता येऊ शकतात.


'लावा झेड41' (Lawa Z41) स्मार्टफोनमध्ये ५ इंची डिस्प्ले आहे. फोनला ५ मेगापिक्सल रियल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला २५०० mAhचा बॅटरी बॅकअप आहे. तसंच १ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉमसह android 9 pie सुविधा देण्यात आली आहे.