नवी दिल्ली : जपानी कार कंपनी टोयोटाची लग्झरी डिव्हिजन लेक्ससने कंपनीची एलएस कार रेंज भारतात लॉन्च केलीये. कंपनीने भारतात हायब्रिड एलएस५००एच ही शानदार कार लॉन्च केलीये. 


काय आहे कारची खासियत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आलिशान लक्झरी लांब व्हिलबेस मॉडलमध्ये ३.५ लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे आणि यासोबतच यात ३१०.८केव्हीची एक लिथियम आयर्न बॅटरी सुद्धा दिली आहे. ही कार केवळ ५.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडण्यात सक्षम आहे. 


हायटेक साऊंट सिस्टम


या कारमध्ये मल्टी स्टेज हायब्रिड सिस्टम आहे. ज्याच्या मदतीने पेट्रोल कमी खर्च होतं. या इंजिनला १० स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलंय. यासोबतच हायटेक सांऊट सिस्टम सुद्धा यात आहे. 


भारतात होणार निर्मिती


कारच्या आत आराम मिळण्यावरही भर देण्यात आलाय. १,०२२ एमएमचं लेगरूम आहे. भारतीय बाजारात गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेली लेक्सस भविष्यात आपल्या वाहनांना बंगळुरू येथील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार करण्याचा विचार करत आहे. 


किती आहे किंमत?


या शानदार कारची एक्स शोरूम किंमत १.८ कोटी रूपये इतकी आहे. या कारचं टॉप व्हर्जन ग्राहकांना १.९ कोटी रूपयाच्या एक्स शोरूम किंमतीत मिळणार आहे.