मुंबई : दिवसागणिक स्मार्टफोन अधिक स्मार्ट होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलमध्ये सहज आणि झटपट टाईप करता यावे याकरिता अनेक प्रकारचे की- बोर्ड उपलब्ध आहेत.
मराठी भाषेतही सहज टाईप करता यावे याकरिता काही खास कीबोर्ड आहेत. पण कीबोर्डच्या पुढे जाऊन मराठी टाईपिंग सुकर करण्यासाठी स्पीच टू टेक्स या तंत्रज्ञावर आधारित आता मराठीतही मेसेज टाईप करणं शक्य होणार आहे.  
लिपीकार मराठी कीबोर्डच्या मदतीने आता मराठीत टाईप करणं अगदी सोप्पे झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने आता तुम्ही जसे बोलाल तसा आपोआप मेसेज टाईप करणं शक्य होणार आहे. या कीबोर्डच्या मदतीने मोबाईलप्रमाणेच, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, नोट पॅडवरही मराठीत टाईप करणं शक्य होणार आहे. 


कसा डाऊनलोड कराल हा की बोर्ड ?  


प्ले स्टोअरवर ‘Lipikar Marathi Keyboard’ असे सर्च करा
स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा.
सार्‍या सूचनांचे पालन करून की बोर्ड डाऊनलोड करा.  
या की बोर्ड चा वापर करताना,मराठी पर्याय निवडून माईकच्या आयकॉनवर क्लिक करा.
तुम्ही जसा उच्चार कराल तसे मराठीत टाईप होईल. 
या की बोर्डचा वापर करताना तुमच्या फोनमध्ये इंटरनेट डाटा/ वाय फाय कनेक्शन चालू असणे गरजेचे आहे.