लंडन : प्रदुषण रोखण्यासाठी जगभरात नवनवे प्रयोग सुरू असतात. लंडनमध्येही असेच प्रयोग सुरू असून, इथे तर आता कॉफीपासून निघणाऱ्या कचऱ्यापासून निर्माण झालेल्या उर्जेवर बस चालणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनच्या परिवहन अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांत आलेल्या माहितीनुसार, कॉफीच्या कचऱ्यापासून निघालेले तेल डीझेलमध्य मिसळून जैव इंधन तयार करण्यात आले आहे. याचा वापर सार्वजनिक परिवहनसाठी इथनाच्या रूपात केला जात आहे.


अर्थात हा प्रयोग सध्या प्रोयोगिक तत्वावर केला जात आहे. प्रयोग जर यशस्वी झाला तर, जैव इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होईल. तसेच, हे इंधन अपारंपरीत उर्जेलाही टक्कर देईन. लंडन येथील टेक्नॉलजी फर्म बायो-बीन लिमिटेडने म्हटले आहे की, एक वर्षात एका बसला पुरेसे होईल इतकी उर्जा निर्माण होण्यासाठी कॉफीचे उत्पादनही घेण्यात आले आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लडन (टीएफएल) परिवहनने धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी जैव इंधन महत्त्वाची जबाबदारी पार पाडेल असे म्हटले आहे.


बायो-बिनने दिल्या माहितीनुसार, लडनमध्ये कॉफीच्या माध्यमातून सुमारे 2 टन कचरा निघतो. कंपनी कॉफीची दुकाने आणि तत्काळ कॉफी फॅक्टरीतून कचरा घेते. तो कचरा आपल्या कारखान्यात नेऊन तिथे त्याच्यावर प्रक्रिया करून तेल काढते. कचऱ्यापासून तेलनिर्मीतीचे हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे.