नवी दिल्ली : महिंद्राने दिवाळीनिमित्त त्यांच्या KUV100 एसयूव्ही या कारचा KUV100 NXT हा नवा अवतार भारतात लॉन्च केलाय. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत ४.३९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध होणार असून या कारचे पाच व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. किंमत कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. 


KUV100 NXT च्या रेग्युलर मॉडलच्या तुलनेत या नव्या मॉडेलच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कारचा संपूर्ण अपिअरन्स बदलला आहे. हेडलॅम्पला नवं डिझाईन देण्यात आलं आहे. तर फ्रन्ट बंपरला कन्व्हेंशनल डिझाईन ऎवजी स्पोर्टी क्रॉसओव्हर लूक देण्यात आलाय. अलॉय व्हिल्स आणि त्यांचे कव्हर्स बदलण्यात आले आहेत. 


महिंद्रा KUV100 NXT ही कार ६ सीटर एसयूव्ही आहे. डिमांड केल्यावर या कारचं ५ सीटर मॉडलही मिळू शकतं. या नव्या कारचं कॅबिन जुन्या मॉडलच्या तुलनेत जास्त बदललं नाहीये. आता नव्या मॉडेलमध्ये ७.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम देण्यात आली आहे. 


KUV100 NXT मध्ये अ‍ॅल्युनिमियमचं १.२ लिटर सीरीज इंजन दिलं गेलं आहे. पेट्रोल इंजिन 82bhp/114Nm ची पावर आणि टॉर्क जनरेट करतो. तर डिझल इंजिन 77bhp/ 190Nm ची पावर आणि टॉर्क जनरेट करतं. हे दोन्ही इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससोबत मिळेल. 


Mahindra KUV100 NXT (एक्स-शोरूम किंमती)


पेट्रोल व्हेरियंट्स - 


K2: ४.३९ लाख रूपये


K2+: ४.७९ लाख रूपये


K4+: ५.२४ लाख रूपये


K6+: ६.०४ लाख रूपये


K8 : ६.४० लाख रूपये


डिझेल व्हेरियंट्स -


K2: ४.३९ लाख रूपये


K2+: ५.६३ लाख रूपये


K4+ : ६.११ लाख रूपये


K6+: ६.९५ लाख रूपये


K8: ७.३३ लाख रूपये