अनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच
Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा पार पडला ज्यासाठी मार्क झुकरबर्ग सपत्नीक उपस्थित होता. त्यांचाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचा प्री-वेडिंग सोहळा 3 दिवस चालला. या सोहळ्याला अनेक परदेशी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मनोरंजन, क्रिडा क्षेत्राबरोबरच कॉर्परेट क्षेत्रातील अनेक दिग्गज जगभरातून या सोहळ्यासाठी आले होते. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची पालक कंपनी असलेल्या 'मेटा'चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग सपत्नीक दिसत आहे. अनंत अंबानींबरोबर गप्पा मारताना अचानक या दोघांचं लक्ष त्यांच्या घड्याळावर जातं ते घड्याळ पाहून झुकरबर्ग दांपत्य थक्क होतं. त्यांच्यातील संपूर्ण संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अनंत अंबानींच्या घड्याळावर नजर पडते अन्...
या सोहळ्यासाठी आलेल्या मार्क आणि त्याची पत्नी प्रेसिला हे निवांत वेळात नेमकं काय करावं याचा विचार करत असतानाच अनंत अंबानी त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. तुम्हाला भटकंतीला जायचंय का? तुमच्याकडे 2 तास आहेत का? असं विचारल्यावर मार्क नक्कीच जायला आवडेल, असं उत्तर देतो. त्यावर मी काहीतरी व्यवस्था करतो तुमच्यासाठी असं म्हणतात. दरम्यान प्रेसिलाची नजर अनंत अंबानींच्या घड्याळावर पडते. "तुझं घड्याळ फारच भन्नाट आहे," असं प्रेसिला म्हणते. त्यावर मार्क, "होय, मी सुद्धा त्याला हेच सांगितलं," असं म्हणतो.
मार्क म्हणतो मला घड्याळं आवडत नाहीत पण...
"मला कधी घड्याळं आवडत नाहीत. मात्र अशी घड्याळं पाहिल्यावर ती फार कूल अशू शकतात असं वाटतंय आता," असं मार्क झुकेरबर्ग म्हणाला. दरम्यान प्रेसिलाने हे घड्याळ कोणत्या कंपनीचं आहे वगैरे माहितीही घेतली. हे घड्याळ रिचर्ड मील (Richard Mille) यांची निर्मितीआहे. घड्याळ पाहिल्यानंतर प्रेसिलाने, "मला हे घड्याळ घ्यायला आवडेल," असंही म्हटलं. मार्क आणि त्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मार्क आणि प्रेसिलाही अंबानींसमोर मध्यम वर्गीय वाटतात अशी खोचक प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे.
1)
2)
3)
ही घड्याळं खास का?
रिचर्ड मील कंपनीची घड्याळं फार महागडी असण्याचं कारण म्हणजे यात अत्यंत खास असं तंत्रज्ञान वापरलं जातं. यात वापरलं जाणारं मटेरिअल फारच खास असतं ज्यात टिटेनियम, कार्बन फायबर यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. ही घड्याळं रोल्स रॉयल कार्सपेक्षाही महाग असतात. अनंत अंबानींचं हे आलिशान घड्याळ तब्बल 14 कोटी रुपयांचं आहे. या घड्याळाचं नाव Audemars Piguet Royal Oak Open Worked Skeleton असं आहे. ही घड्याळं महाग असली तरी ती कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असलेली असतात.