वॉशिंग्टन : मी फेसबूकचा वापर चांगल्या उद्देशाने व्हावा म्हणून सोशल मीडिया सुरु केले. लोकांनी एकत्र येवून चांगले विचार मांडावेत असा होता. मात्र, याचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यात होत आहे. याबद्दल मी जनतेची जाहीर माफी मागतो, असा शब्दात फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने खंत व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माफी मागतानी झुकरबर्ग याने कोणत्याही एखाद्या प्रसंगाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने फेसबूकचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी केला. याचे पुरावे समोर आले आहेत, त्याचा संदर्भ झुकरबर्गच्या माफीमागे असल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलेय.


आपल्या फेसबूक अकाऊंटवरून झुकरबर्गने हे माफीपत्र प्रसिद्ध केले आहे. या वर्षभरात मी ज्यांना दुःख पोहोचवले, त्यांची मी माफी मागतो. मी कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, असे झुकरबर्गने म्हटलेय. फेसबूकचा वापर लोकांना एकत्र आणण्याऐवजी फूट पाडण्यासाठी केला जात असल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटलंय.