30KM चा मायलेज, हायटेक फीचर्स! Maruti च्या `या` कारने सर्वांना पाजलं पाणी, विक्रीत ठरली 1 नंबर
Maruti कंपनीने ऑक्टोबर 2015 मध्ये सर्वात प्रथम Baleno कारला भारतीय बाजारपेठेत लाँच केलं होतं. तेव्हापासून ही कार आपल्या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे. नुकतंच कंपनीने या कारला हाय-टेक फिचर्ससह अपडेट करत नव्याने बाजारात आणलं आहे. यामुळे ही कार अधिक प्रीमियम झाली आहे.
मे महिना अनेक वाहन निर्माता कंपन्यांसाठी चांगला ठरला. याचं कारण मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्ससहित सर्व कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. पण गेल्या महिन्यात मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हाय-टेक फिचर्स आणि अतिरिक्त सुरक्षित फिचर्स असणाऱ्या या कारने इतर सर्वांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
नुकतंच मारुती सुझुकीने Baleno ला नव्या फिचर्ससह अपडेट केलं आहे. आता ही कार पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड CNG किटसह उपलब्ध आहे. Maruti Baleno च्या बेस व्हेरिंयंटमध्येही कंपनीने ESP आणि हिल होल्ड असिस्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत. नव्या फिचर्समुळे बेसिक मॉडेलच्या किंमतीत 12 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. या कारची किंमत 6.61 लाख ते 9.88 लाखापर्यंत आहे.
विक्रीत पटकावला पहिला क्रमांक
मारुती सुझुकीने गेल्या मे महिन्यात Baleno च्या एकूण 18 हजार 773 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात केलेल्या 13 हजार 970 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ 34 टक्के जास्त आहे. यासह ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. तसंच दुसऱ्या क्रमांकावर Swift आहे. मे महिन्यात Swift च्या 17 हजार 349 युनिट्सची विक्री झाली आहे. दरम्यान तिसऱ्या स्थानावर 16 हजार 258 युनिट्ससह Wagon R ने जागा मिळवली आहे. यानंतर Hyundai Creta आणि Tata Nexon यांचा क्रमांक आहे.
Maruti Baleno मध्ये खास काय?
कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत आणण्यात आलेली ही पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कंपनीने 2015 मध्ये सर्वात प्रथम ही कार लाँच केली होती. ही कार ग्लोबल मार्केटमध्येही उपलब्ध असून, तिथेही चांगली कामगिरी करत आहे. नुकतंच कंपनीने नव्या हाय-टेक फिचर्ससह अपडेट करत ही कार नव्याने मार्केटमध्ये लाँच केलं आहे. यामुळे ही कार अधिक प्रीमियम झाली आहे.
ही कार एकूण 9 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.2 लीटर नॅच्यूलर एक्स्पायर्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 12 व्होल्ट माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासब येतं. हे इंजिन 89Bhp ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करतं. याचं पेट्रोल व्हेरियंट 22 किमी प्रती लिटर आणि CNG व्हेरियंट 30 किमी प्रती\किग्रॅमपर्यंत मायलेज देते.
फिचर्स काय आहेत?
Maruti Baleno मध्ये कंपनीने अजून काही फिचर्स जोडले आहेत. यामध्ये 6 एअरबॅग, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमांयडर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट, सीट बेल्ट टेंशनर देण्यात आलं आहे. याशिवाय कारमध्ये आधीपासून असणारे फिचर्सही आहेत. जसंकी, हायलोजन प्रोजेक्टर हेडलँप, LED टेललँप, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर डिफॉगर, ऑल पॉवर विंडो, किलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, सेमी डिजिटल इंस्ट्रमेंट पॅनल.