Maruti Brezza LXI And VXI : आता भारतात फेस्टिव्हल सिझन सुरू होतील. अशातच अनेक ऑफर्स नागरिकांसाठी तयार केल्या जातात. सणासुदीच्या दिवसांत कार खरेदीचे प्रमाणही वाढते. अलीकडे कार फायनान्स मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने कार खरेदी करणेही सोप्पे झाले आहे. तुम्ही पण एखादीस्वस्त आणि मस्त एयसुव्ही कार खरेदी करण्याचा विचार करताय तर तुमच्यासाठी मारुती सुजुकीची ब्रेजा हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे, फक्त दोन लाख रुपयांपर्यंतचे डाउनपेमेंट करुन तुम्ही बेस मॉडेल एलएक्सआय किंवा वीएक्सआय कार घरी घेऊन जाऊ शकता. डाउनपेमेंटनंतर महिन्याला किती EMI असेल याची सर्व माहिती जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुजुकी ब्रेझा ही कार  LXi, VXi, ZXi और ZXi+ सारख्या चार ट्रिम लेव्हलच्या 15 व्हेरियंटमध्ये विकली जाते. तर, कारची एक्स शोरुम किंमत 8.29 लाख रुपयांनी सुरू होऊन 14.14 लाख रुपयांपर्यंत आहे. 5 सीटर असलेल्या एसयुव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजन असून ब्रेझामध्ये सीएनजीचा ऑप्शनही आहे. तर, कारमध्ये 5 स्पीड मॅनुअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. ब्रेझाच्या MT व्हेरियंटचे मायलेज 17.38 kmpl आहे. तर, AT व्हेरियंटचे मायलेज 19.8 kmpl पर्यंत आहे. तर, CNG MT व्हेरियंट मायलेज  25.51 km/kg पर्यंत आहे. 


मारुती सुजुकी ब्रेझाची बेस मॉडल एलएक्सआयची एक्स शोरुम किंमत 8.29 लाख रुपये इतकी आहे. तर, ऑन रोड किंमत 9,32,528 इतकी आहे. जर तुम्ही ब्रेजा एलएक्सआय कार दोन लाख रुपयांचे डाउनपेमेंट करुन बाकीची किंमत फायनान्स करताय तर 7.32,528 रुपयांचे लोन करावे लागणार आहे. लोनचा कालावधी हा ५ वर्षांपर्यंत असून व्याजदर 9 टक्के इतका आहे. 


९ टक्के व्याजदरानुसार ५ वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहिन्याला 15,206 ईएमआय भरावा लागणार आहे. ब्रेझा एलएक्सआय पेट्रोल मॅन्युअल व्हिरेयंटसाठी कर्ज काढल्यानंतर तुम्हाला 5 वर्षांपर्यंत जवळपास 1.8 लाख रुपये व्याज द्यावे लागणार आहे. 


मारुती सुझुकी ब्रेजा वीएक्सआयची एक्स शोरुम किंमत 9.64 लाख रुपये असून ऑन रोड प्राइस 10,81,545 रुपये आहे. जर ब्रेजा वीएक्सआय तुम्ही दोन लाख रुपयांचे डाउनपेमेंट करुन फायनान्स करत आहात तर तुम्हाला 8,81,545 रुपयांचे कर्ज मिळणार आहे. कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असून व्याजदर 9 टक्के इतका असेल. तर, पाच वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिना 18,299 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. 5 वर्षांपर्यंत जवळपास 2 लाख रुपये व्याज द्यावे लागणार आहे. 


Disclaimer: मारुती सुझुकी ब्रेझाचे हे दोन्ही प्रकार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपला भेट द्यावी आणि कारचे कर्ज आणि EMI तपशील तपासा