Maruti SUV Cars: देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीच्या दोन गाड्या लाँच होण्याआधीच मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने Maruti Jimny आणि Fronx या दोन्ही SUV सादर केल्या होत्या. यावेळी कंपनीने दोन्ही गाड्यांचं बुकिंगही सुरु केलं होतं. दरम्यान या दोन्ही गाड्या लाँच होण्याआधीच 38 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये Fronx चे 15 हजार युनिट्स आणि Jimny चे 23 हजार युनिट्स आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maruti Fronx 1.0 टर्बो पेट्रोल आणि 1.2 पेट्रोल इंजिनसह येत आहे. यामध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्स देण्यात आला आहे. याचं टर्बो पेट्रोल इंजिन 100 PS ची पॉवर आणि 147Nm चा टार्क जनरेट करते. तसंच नॅच्यूरल एस्पिरेटेड K सीरिज इंजिन 89.73 PS ची पॉवर आणि 113Nm चा टार्क जनरेट करतं. या एसयुव्हीला 5-स्पीड मॅन्यूअल, ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह सादर केलं जाणार आहे. 


या मारुतीला नेक्सा आऊटलेट्सच्या माध्यमातून विकलं जाणार आहे. कंपनीने या कारला Heartect प्लॅटफॉर्मवर तयार केलं आहे. दरम्यान कंपनी ही कार CNG व्हेरियंटमध्येही आणण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात कंपनी ही कार विक्रीसाठी लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 8 लाख ते 11 लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे. 


Maruti Jimny कार कशी असेल?


Maruti Suzuki Jimny कारला पाच दरवाजे असणार आहे. जागतिक बाजारपेठेत आधीच तीन दरवाजांच्या कार उपलब्ध आहेत. ही SUV लॅडर फ्रेम चेसिसवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये वॉशरसह LED हेडलँप देण्यात आला आहे. तसंच 5 स्लॉट आयकॉनिक व्हर्टिकल ग्रिल देण्यात आले आहेत, ज्यांना क्रोमने सजवण्यात आलं आहे. 


Maruti Suzuki Jimmy मध्ये कंपनीने 1.5 लीटर क्षमतेच्या K सीरिज नॅच्यूरल एक्स्पायर्ड पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 103 bhp ची दमदार पॉवर आणि 134Nm चा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 5 स्पीड मॅन्यूअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. याशिवाय याच्यात फोर व्हिल ड्राइव्ह (4X4) ऑल प्रो सिस्टम देण्यात आली आहे. या SUV मध्ये कंपनीने आर्कमिजच्या प्रिमियम सराऊंड साऊंड सिस्टमचा वापर केला आहे.