Maruti Baleno CNG, Swift CNG, XL6 CNG: देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. दर महिन्याला येणाऱ्या आकडेवारीवरून ही बाब अधोरेखित होते. मारुति सुझुकीने नुकत्याच तीन नव्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत. यात बलेनो सीएनजी आणि एक्सएल 6 सीएनजी एकत्र लाँच केल्या आहेत. तर स्विफ्ट सीएनजी याआधी लाँच केली होती. या गाड्या पूर्वी फक्त पेट्रोल इंजिनवर आधारित यायच्या. आता या गाड्यांमध्ये एस-सीएनजी तंत्रज्ञानासह बाजारात आणल्या आहेत. तिन्ही गाड्यांच्या किमती आणि मायलेज वेगवेगळा आहे. चला तर जाणून घेऊयात सीएनजी कारबाबत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलोनो सीएनजीची किंमत आणि मायलेज- मारुति सुझुकीने बलेनोच्या डेल्टा एमटी आणि झेटा एमटीमध्ये सीएनजी किट दिलं आहे. मारुति बलोनो सीएनजी डेल्टा एमटीची किंमत 8.28 लाख रुपये, तर बलेनो सीएनजी झेटा एमटी व्हेरियंटची किंमत 9.21 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स शोरूम आहे. मारुति बलेनो सीएनजी 30.61 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. बलेनो कंपनीच्या प्रीमियम नेक्सा डिलरशिप विकली जाणारी टॉप सेलिंग प्रीमियम हॅचबॅक आहे.


एक्सएल6 सीएनजी किंमत आणि मायलेज- मारुति सुझुकी नेक्सा डिलरशिपवर विकल्या जाणाऱ्या एक्सएल6 एसयूव्हीत सीएनजी किट ऑफर केलं आहे. यापैकी फक्त झेटा व्हेरियंटमध्ये सीएनजी किट मिळतं. एक्सएल6 झेटा सीएनजीची किंमत 12.24 लाख (एक्स शोरूम) आहे. ही गाडी 26.32 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. ही गाडी एक्सएल झेटा पेट्रोल मॉडेलपेक्षा 96 हजार रुपयांनी महाग आहे.


Car Tips: कारमधील या बटणाचा योग्य वापर कसा होतो? जाणून घ्या कसं काम करतं


स्विफ्ट सीएनजीची किंमत आणि मायलेज- मारुति स्विफ्टच्या वीएक्सआय आणि झेडएक्सआय व्हेरियंटमध्ये सीएनजी किट दिली गेली आहे. यापैकी स्विफ्ट वीएक्सआय सीएनजीची किंमत 7.77 लाख रुपये आणि स्विफ्ट झेडएक्सआय सीएनजीची किंमत 8.45 लाख रुपये आहे. या दोन्ही किमती एक्स शोरूम आहेत. स्विफ्ट सीएनजीमध्ये 1.2 L k-Series ड्युअलजेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आहे. सीएनजीवर ही गाडी 30.90 किमी मायलेज देऊ शकते.