Maruti Suzuki Mileage: देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री होते. यावरून या गाड्यांची किती क्रेझ आहे, ते दिसून येतं. मारुति सुझुकीची अल्टो कार बजेटमध्ये असल्याने या गाडीला सर्वाधिक पसंती आहे. जर अल्टो सीएनजी कार म्हटलं तर मायलेजचं नो टेन्शनच. असं असलं तरी मारुति सुझुकीची आणखी एक गाडी भारी मायलेज देते. अल्टो सीएनजीपेक्षा सेलेरियो सीएनजी चांगला मायलेज देते. मारुतिने या वर्षीच्या सुरुवातीला सेलेरियो लाँच केली होती. सेलेरियो सीएनजीची किंमत 6.69 लाख (एक्स शोरूम) आहे. तर पेट्रोल वर्जन किंमत 5.25 लाखांपासून सुरु होते आणि 7 लाख रुपयांपर्यंत जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सेलेरियो सीएनजीचा मायलेज 35.60 किमी आहे. तर अल्टोचा मायलेज 31.59 किमी आहे. अशा स्थितीत सेलेरिओ अल्टोपेक्षा सुमारे 4 किलोमीटर अधिक मायलेज देते हे स्पष्ट होते. केवळ सीएनजीवरच नाही तर सेलेरियो (पेट्रोल) चा मायलेज देखील अल्टो (पेट्रोल) पेक्षा चांगला आहे. अल्टो (पेट्रोल) 22.05 किमीपर्यंत मायलेज देते तर सेलेरियो पेट्रोल 24.97 किमी ते 26.68 किमी (व्हेरियंटवर अवलंबून) मायलेज देते.


सेलेरियोमध्ये 1.0 -लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध असून सीएनजीचा पर्यायही आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड एएमटीचा पर्याय आहे. 5-स्पीड एएमटी पर्याय सीएनजी प्रकारात उपलब्ध नाही. सीएनजी प्रकारात फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले दिलं आहे. सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण असून पॅसिव्ह कीलेस एंट्री फीचर उपलब्ध आहे. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि हिल-होल्ड असिस्ट देखील दिलं आहेत.