Maruti Suzuki Fronx CNG: मारुति सुझुकीने (Maruti Suzuki) गुपचूप आपली नवीन कार बाजारात लॉन्च केली आहे. फ्रोंक्सचं सीएनजी मॉडेल कंपनीने अचानक बाजारात उतरवलं आहे. विशेष म्हणजे या मॉडेलची किंमत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेंजमध्ये आहे. भारतामध्ये फ्रोंक्स सीएनजी 8 लाख 41 हजार रुपयांना (एक्स-शोरुम, दिल्ली किंमत) लॉन्च करण्यात आली आहे. फ्रोंक्स सीएनजी ही मारुती सुझुकीची 15 वी सीएनजी कार ठरली आहे. सिग्मा आणि डेल्टा या दोन व्हेरिएंटमध्ये ही फॅक्ट्री फिटेड सीएनजी कार लॉन्च करण्यात आली आहे.


दमदार मायलेजचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रोंक्स सीएनजीमध्ये 1.2 लीटर सीरीजच्या पेट्रोल इंजिनवर काम करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्स सिस्टीमवर काम करतं. 76 बीएचपी पॉवर जनरेट करण्याची या इंजिनची क्षमता आहे. तर 98.5 एनएम टॉर्क या इंजिनच्या माध्यमातून तयार होते. फ्रोंक्स सीएनजी ही कार किती मायलेज देते असा प्रश्न पडला असेल तर कंपनीच्या दाव्यानुसार एक किलो सीएनजीमध्ये ही गाडी 28.51 किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते असं सांगितलं जात आहे.


महिन्याला 23 हजार भरण्याचा स्पेशल प्लॅन


फ्रोंक्स सीएनजी ही कार सबस्क्रीप्शन योजनेअंतर्गतही विकत घेण्याचा पर्याय कंपनीने ग्राहकांना दिला आहे. त्यासाठी ग्राहकांना प्रतिमहिना किमान 23 हजार 248 रुपयांपासून सुरु होणारा सबस्क्रीप्शन प्लॅन निवडावा लागेल. फ्रोंक्स सिग्मा सीएनजी कार 8.41 लाखांना उपलब्ध असून फ्रोंक्स डेल्टा सीएनजी 9.27 लाखांना विकत घेता येईल.


कारमध्ये कोणकोणत्या सुविधा?


फ्रोंक्स सीएनजीच्या फिचर्सबद्दल सांगायचं झाल्यास या कारमध्ये 9 इंचांचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, क्रूज कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस अॅण्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, हेड-अप डिस्प्ले, आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर आणि ईबीडीसहीत एबीएसची सुविधा देण्यात आली आहे. फ्रोंक्स सीएनजी ही 5 सीटर क्रॉसओव्हर कार आहे. यामध्ये 308 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे.


स्पर्धा कोणाशी?


फ्रोंक्स सीएनजीला एवढ्या कमी प्राइज रेंजमध्ये थेट टक्कर देणारी कोणतीही कार सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. मात्र किया सोनेट, हुंडाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महेंद्रा एक्सयू्व्ह 300, रेनॉल्ट किगर, निसान मॅग्नाइट, मारुति ब्रेझा आणि हुंडाई एक्सटर सारख्या कार सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत या कारशी स्पर्धा करतील.