मारूतीची 3.5 लाखात लाँच होणार SUV
पाहा याचे फिचर्स
मुंबई : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकी सोमवारी आपली स्वस्त एसयूवी(SUV)एस-प्रेसो लाँच करणार आहे. देशात ऑटो मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत असतानाच मारूती आपली ही मिनी एसयूवी कार लाँच करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे इतर कंपन्यादेखील गाडी लाँच करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रिनॉल्टने सर्वात स्वस्त 7 सीटर एमपीवी लाँच केली आहे.
3.50 लाखापासून सुरूवात
मारूतीच्या या नव्या मिनी एसयूवीबद्दल ग्राहकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे. मारूतीच्या एस-प्रेसो या कारची किंमत ही 3.50 लाखापासून सुरू होत आहे. एक्सशोरूमची किंमत ही असणार आहे. एस-प्रेसोच्या टॉप वेरिएंटबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत 5.30 लाख रुपये इतकी आहे.
कारमध्ये BS6 या इंजिनचा वापर
मारूतीच्या या छोट्या एसयूवीमध्ये BS6 नावाचं इंजिन बसवण्यात येत आहे. कंपनीना या कारचे चार वेरिएंट बाजारात लाँच केले आहेत. यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजीन असलेले वेरिएंट हे. यामध्ये Std, Lxi, Vxi आणि VXi+ अशी नावे आहेत.
कारचं इंजीन
SUV S-Presso मध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजीन आहे. यामध्ये 5500 RPM bj 68 hp पावर देण्यात आली आहे. तसेच 90Nm टॉर्क जेनरेट देखील आहे. 5 स्पीड मॅन्युअल गीयरबॉक्ससोबतच ऑटो गिअर शिफ्टचा देखील ऑप्शन देण्यात आलं आहे. मारूती एस-प्रेसोची लांबी 3565 मीमी, रूंदी 1520 मीमी आणि उंची 1564 मीमी आणि व्हील बेस 2380 मीमी आहे.
टेस्टिंग दरम्यान एस-प्रेसो कारचा लूक हा अगदी स्पोर्टी लूक दिसला. तज्ञांना आशा आहे की, मारूती कंपनी या कारला स्वस्तः कारच्या रुपात लाँच करेल. या कारची किंमत 3.50 ते 4 लाख असू शकते. कंपनी या कारची विक्री अरीना डिलरशीपमार्फत करणार आहे. या अगोदर ही कार ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर करण्यात आली होती.