मुंबई : एखाद्या घराच्या स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला लांबलचक मगर पोहताना आढळली तर...? कल्पना करवत नाही ना... पण, हे दृश्य सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये ही घटना घडलीय. वेनिसच्या एका घरातल्या स्विमिंगपूलमध्ये तब्बल ८ फूट लांब मगर घुसली होती... पोलीस आणि वनविभागाच्या मदतीनं तिला बाहेर काढण्यात आलं. 


सारासोटा कन्ट्री फ्लोरिडाच्या पोलिसांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूक पेजवरून या मगरीला पकडल्याचा व्हिडिओ जाहीर केलाय. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर या मगरीला एका सुरक्षित स्थानावर सोडण्यात आलं.