Maruti Wagon R Waltz: देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली नवी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या पोर्टफोलिओला अपडेट करत प्रसिद्ध हॅचबॅक कार Wagon R च्या वॉल्टज एडिशनला लाँच केलं आहे. नव्या Wagon R Waltz मध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक अपडेट केले आहेत, जे रेग्युलर मॉडलेच्या तुलनेत तिला अधिक दमदार बनवतात. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या फॅमिली कारची सुरुवातीची किंमत 5.65 लाख (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. 


कशी आहे नवी Wagon R Waltz:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Wagon R Waltz एडिशनला कंपनीने एकूण तीन व्हेरियंट्स LXi, VXi आणि ZXi मध्ये सादर केलं आहे. यामध्ये अपडेटेड कोम फ्रंट ग्रिल, क्रोम गार्निशसह फॉग लॅम्प, व्हील आर्क क्लॅडिंग, साइड स्कर्ट, साइड बॉडी मेल्टिंग यांचा सहभाग करण्यात आला आहे. या नव्या गोष्टी कारच्या एक्स्टिरिअरला अजून स्पोर्टी लूक देत आहेत. 


कारच्या केबिनमध्येही कंपनीने काही अपडेट्स दिले आहेत. ज्यामध्ये नवे फ्लोअर मॅट्स, सीट कव्हरचाही समावेश आहे. याशिवाय 6.2 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, नवे स्पीकर्स, सेक्युरिटी सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंगसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या फिचर्सचा समावेश केल्यानंतर कारचं केबिन आता अपग्रेडेड वाटत आहे. 


पॉवर आणि मायलेज


कंपनीने 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर पेट्रोल इंजिन पर्यायांसह WagonR Waltz एडिशन सादर केलं आहे. मोठं इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह देखील उपलब्ध आहे. याशिवाय ही कार कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्येही सादर करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचं पेट्रोल व्हेरियंट 25.19 किमी/लीटरचे आणि CNG प्रकार 33.48 किमी/किलो मायलेज देते.


सेफ्टी फिचर्स


WagonR Waltz मध्ये काही नवीन सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत. ही कार आता इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) ने सुसज्ज आहे. याशिवाय इतर फिचर्स पूर्वीप्रमाणेच आहेत. यात ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड लिमिट अलर्ट असे फिचर्स आहेत.