मुंबई : आयफोनचे 3 नवे मॉडेल्स कालपासून भारतीय बाजारापेठेत उपलब्ध झाले आहेत. दमदार फिचर्स आणि किंमतीसह अॅपलचे 3 नवे फोन आज भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहेत. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स असे हे तीन मॉडेल्स आहेत. 76 हजार 900 रुपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आयफोनच्या किंमतीत हे फोन उपलब्ध होत आहेत. 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि ड्युएल सिम अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा फोन मोबाईलप्रेमींना भुरळ पाडणारा आहे.  जर तुम्ही आयफोनचे फॅन आहात आणि  आयफोन एक्सएस आणि एक्स मॅक्स घेण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. विविध ऑफर्सचा फायदा घेऊन आयफोनच्या खरेदीवर तुम्हाला 7000 पर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. 


ईकॉमर्स साईट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि पेटीएमवरून खरेदी केले जाऊ शकतात. याशिवाय अॅपल प्रिमियम रिसेलर ऑफिशियल स्टोअर्सवर फोन डिव्हाइस विक्रीसाठी आहेत. ईकॉमर्स साईट पेटीएम मॉलवर एक्स्चेंज बोनसवर तुम्ही 7000   रुपये वाचवू शकता. अॅपलचे जुने आयफोनदेखील तुम्ही इथे स्वस्तात खरेदी करु शकता.


नव्या आयफोनची वैशिष्ट्ये 


स्टोरेज 
आयफोन 10 आर - 64 जीबी पासून 256 जीबी पर्यंत 
आयफोन  10एस  - 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत 
आयफोन  10एस मॅक्स - 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत 


कॅमेरा 
 आयफोन 10 आर - 12 मेगापिक्सल सिंगल वाइड अॅंगल कॅमेरा 
आयफोन 10 एस- 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा 
आयफोन 10 एस मॅक्स - 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा 


डिस्प्ले 
आयफोन 10 आर -6.1 इंच एलसीडी डिस्प्ले
आयफोन  10एस  -5.8 इंच ओएलईडी डिस्प्ले
 आयफोन  10एस मॅक्स - 6.5 इंच ओएलईडी डिस्प्ले


रिझॉल्यूशन 
आयफोन 10 आर -     1792*828पी रिझॉल्यूशन 
आयफोन 10 एस-  2436*1125पी रिझॉल्यूशन 
आयफोन 10 एस मॅक्स -  2688*1242पी रिझॉल्यूशन   
  
किंमत 
आयफोन 10 आर - 76 हजार 900 रु. पासून 91 हजार 900 रु. पर्यंत 
आयफोन  10एस - 99 हजार 900 रु. पासून 1 लाख 14 हजार 900 रु. पर्यंत 
आयफोन  10एस मॅक्स - 1 लाख 09 हजार 900 रु. पासून  1 लाख 44 हजार 900 रु. पर्यंत