Mark Zuckerberg Threads : मोजणंही अशक्य होईल इतक्या मोठ्या पातळीवर असंख्य अॅप्स आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत. यापैकी काही अॅप्सनी युजर्सचा विश्वास जिंकण्यातही यश मिळवलं आहे. यामध्ये ट्विटर असो किंवा मग मेटाचे काही अॅप्स. ही नावं कायमच पुढे असतात. येत्या काळात याच नावांमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळू शकते. कारण, एलॉन मस्कच्या ट्विटरला मार्क झुकरबर्ग आता थेट आव्हान देताना दिसणार आहे. 


थ्रेड्स अॅप लाँच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेच व्हर्जन लीक झाल्यानंतर अखेर मेटाचं Threads अॅप लाँच झालं आहे. हे Text Based App चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याची थेट स्पर्धा Twitter शी आहे. खुद्द झुकरबर्गनंच हे अॅप लाँच केलं. आश्चर्याची बाब म्हणजे इन्स्टाग्रामच्या (Innstagram) च्याच टीमनं हे अॅप तयार केलंय जिथं Real Time Feed मिळते. 


कसं वापराल हे अॅप? 


झुकरबर्गनं हे अॅप लाँच करताच अवघ्या दोन तासांच ते जवळपास 20 लाखांहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केलं. राहिला मुद्दा हे अॅप वापरायचं कसं याबाबतचा तर, हे टेक्स्ट बेस्ट अॅप आहे ही बाब लक्षात घ्या. तुम्ही जर ट्विटवर यापूर्वी वापरलं असेल तर, हे अॅप वापरण्यात तुम्हाला फारसे अडथळे येणार नाहीत. कारण, त्याची Operating फारशी ट्विटरशीच मिळतीजुळती आहे. 


यामध्ये तुम्हाला 500 कॅरेक्टर पोस्ट करता येतात. जिथं तुम्ही वेब लिंक, फोटो (एका वेळी 10 फोटो) आणि मिनिटभराचे व्हिडीओ पोस्ट करू शकता. इथंही तुम्ही एखाद्या युजरला फॉलो किंवा त्याला ब्लॉक करु शकता. महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही कोणाला इन्स्टाग्रामवर Block केलं असेल तर तो युजर तुमच्या थ्रेड अकाऊंटवरही ब्लॉकच असेल. यामध्य़े अद्याप थेट मेसेज करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. 


हेसुद्धा वाचा : शत्रूवर मात ते परमोच्च आनंद; दलाई लामा यांची 'ही' 10 वचनं देतात जगण्याचा कानमंत्र 


11 वर्षांनंतर मार्क झुकरबर्ग ट्विटरवर सक्रिय 


2009 पासून ट्विटर अकाऊंट सुरु करूनही मार्क झुकरबर्ग गेली 11 वर्षे मात्र इथं अजिबातच सक्रिय नव्हता. पण, थ्रेड्स लाँच केल्यानंतर मात्र त्यानं एक ट्विट केलं आणि सर्वांच्याच नजरा वळल्या. 60 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हे ट्विट पाहिलं आणि त्याबाबतचे तर्कही लावले.



या ट्विटमध्ये त्यानं स्पायडरमॅनच्या कार्टूनचा फोटो शेअर केला. जिथं दोन स्पायडरमॅन एकमेकांसमोर उभे असून, त्यांनी एकमेकांकडे इशारा केल्याचं पाहायला मिळत आहे. थ्रेड्स लाँच झाल्यानंतर ट्विटकवर झुकरबर्गनं हा फोटो पोस्ट करण्यामागचा नेमका अर्थ आता तुम्हालाही कळलाच असेल.