मुंबई : 'मी टू' चळवळीनंतर गुगलनेही आपला नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक शोध घेतला गेला. जगभरातील ज्या शहरात मी टू मोहीम ट्रेन्ड्रिंग ठरतेय ती शहरं गुगलच्या नकाशात लख्ख चकाकताना गुगलने दाखवलेली असून भारताचा विचार करता केवळ ठराविक शहर नाही तर संपूर्ण भारत चकाकताना दिसतोय. 


१ ऑक्टोबर २०१७ पासून घेतलेला हा आढावा आहे. अर्थात महिला अत्याचाराच्या घटना पाहाता ही बाब भूषणावह नाही.