MG Comet EV: सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Cars) मागणीत प्रचंड वाढ झालेली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतीय बाजारपेठ एक मोठं मार्केट ठरत आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत तब्बल 200 टक्के वाढ नोंद झाली असल्याने अनेक कंपन्या या स्पर्धेत उतरताना दिसत आहे. त्यातच आता MG Motors ने भारतीय बाजारपेठेत जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने अधिकृतपणे MG Comet EV ला बाजारपेठेत आणलं आहे. कंपनीकडून लाँच करण्यात आलेली ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. याआधी MG eZS ही कार लाँच करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MG Comet EV आपल्या जबरदस्त लूक आणि किंमतीमुळे चांगलीच चर्चेत आहे. या कारमध्ये दोन दरवाजे आणि चार सीट्स आहेत. कंपनीने 15 मे पासून या कारचं बुकिंग सुरु होईल अशी माहिती दिली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि डिलरशीपच्या माध्यमातून या कारचं बुकिंग करता येणार आहे. तसंच 27 एप्रिल म्हणजे आजपासून टेस्ट ड्राइव्हला सुरुवा करण्यात आली आहे. मे महिन्यात कारची डिलिव्हरीही सुरु होईल. 


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या किंमती जास्त असताना ही कार मात्र सर्वात स्वस्त असणाऱ्या Tata Tiago EV पेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहे. ही कार विकत घ्यायची असल्यास 8 लाख 69 हजारांपासून उपलब्ध होणार आहे. 


फिचर्स काय?


MG Comet EV चा लूक आणि डिझाइन तरुणांना लक्षात ठेवत तयार करण्यात आला आहे. इंडोनेशियात विकल्या जाणाऱ्या Wuling Air EV कारचं हे रिबेज्ड व्हर्जन आहे. कंपनीने वेगवेगळ्या रंगात ही कार आणली आहे. दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने ही कार फार उत्तम असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान Tata Tiago EV च्या तुलनेत ही कार छोटी आहे. 


या कारमध्ये LED हेडलँप, LED टेललाइट्स, डे टाइम रनिंग लाइट्स, 12 इंचांचं स्टील व्हील देण्यात आलं आहे. तसंच इंटिरियरबद्दल बोलायचं गेल्यास, 10.25 इंचाचा टचस्क्रीन इंफोमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कार प्लेला सपोर्ट करतं. स्टिअरिंग व्हिलला कंट्रोल बटण देण्यात आले आहेत. हे डिझाइन iPad पासून प्रेरित आहे. 


सिंगल चार्जमध्ये 230 किमी


या कारमध्ये 17.3kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp ची पावर आणि 110Nm चा टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचा प्रवास करेल असा कंपनीचा दावा आहे. 3.3kW च्या चार्जरने बॅटरी चार्ज करण्यास जवळपास 7 तास लागतात. तर 5 तासात ही बॅटरी 80 टक्के चार्ज होते. 


MG Motors ने या कारच्या चार्जिंगचा खर्च फार कमी असल्याचा दावा केला आहे. या कारच्या चार्जिंगचा संपूर्ण महिन्याचा खर्च फक्त 519 रुपये इतकाच आहे. ही किंमत 1000 किमी अंतराच्या हिशोबाने देण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही दिवसाला 33 किमीचा प्रवास करु शकता.